Download App

बदलापूर प्रकरणातील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न, विरोधकांनी केला एन्काउंटरचा आरोप

बदलापूर अत्याचार (Badlapur) प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याने स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे

  • Written By: Last Updated:

Sushma Andhare : बदलापूर अत्याचार (Badlapur) प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde)  याने स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. सध्या अक्षयची प्रकती चिंताजनक असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, यावर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare)प्रतिक्रिया दिली. या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी अंधारेंनी केली.

Akshay Shinde Encounter : आरोपीच्या हाती बंदूक कशी आली? या प्रकरणाची न्यायिक चौकशी करा; वडेट्टीवारांची मागणी 

अक्षय शिंदे याने सोमवारी सायंकाळी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात असताना हा प्रकार घडला. पोलिस व्हॅनमध्ये ट्रान्झिट रिमांडसाठी नेले जात असताना, त्याने जवळच असलेल्या पोलिसाची बंदूक हिसकावून आत्महत्येचा प्रयत्न केला. यावरून विरोधकांनी अक्षयचा एन्काऊंटर करण्यात आल्याचा आरोप केला आहे.  सुषमा अंधारे म्हणाल्या की, मला एन्काउंटर झाल्याची माहिती मिळाली. या प्रकरणात पोलिसांनी स्वसंरक्षणाचा बनाव केल्याचा दिसतो. हा बनाव विश्वास ठेवण्यासारखा नाही. अक्षय शिंदे हिंसक होता का? त्याची पार्श्वभूमी तशी होती का? जर होती तर काळजी का घेतली नाही? दोन्ही हातात बेड्या ठोकलेल्या माणूस बंदूक काढून घेतो यावर कोण विश्वास ठेवणार? असा सवाल त्यांनी केला.

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर, देवेंद्र फडणवीसांकडून चौकशीचे आदेश 

पुढं त्या म्हणाल्या की,  प्रकरणातील संस्थाचालक आपटे अद्याप फरार का आहे? हे प्रकरण जागच्या जागी दाबण्यासाठी हा प्रकार झाला आहे का? अक्षय शिंदेचा आवाज जागच्या जागी बंद केला का? याप्रकरणातील पोलिस निलंबित झाले पाहिजेत. या सर्व प्रकाराच्या मुळाशी जाऊन सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी अंधारे यांनी केली आहे.

या घटनेचे कोणीही राजकारण करू नये – उज्ज्व निकम
या घटनेचे कोणीही राजकारण करू नये. या घटनेची न्यायालयीन चौकशी केली जाईल. पण त्याचे राजकारण करून त्यातून वेगळा अर्थ काढण्यात आता काहीही अर्थ नाही. आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे होते आणि त्याला दोन बालिकांनी ओळखले होते. त्यामुळं त्याची मानसिक स्थिती बिघडली असून त्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची शक्यता वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली आहे.

12 आणि 13 ऑगस्ट रोजी मुंबईतील बदलापूर येथील शाळेत सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या अक्षय शिंदेवर दोन अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला होता. पीडितेने घडलेला प्रकार तिच्या पालकांना सांगितला. त्यानंतरच ही बाब समोर आली. या प्रकरणावरून मोठा गदारोळ झाला होता. आंदोलकांनी सुमारे 10 तास रेल्वे मार्ग रोखून धरला होता.

 

follow us