Download App

VIDEO : वडिलांवर गोळी झाडली, ‘ती’ माझ्या हाताला घासून गेली; संजय लेलेंच्या मुलाने सांगितला थरार

माझ्यासमोर वडिलांवर गोळी झाडली, तेव्हा माझा हात वडिलांच्या डोक्याजवळ होता, माझ्या हाताला गोळी घासून गेली असल्याचा थरार हर्षल लेलेंनी सांगितला.

Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरमधील पहलगमामध्ये दहशतवाद्यांच्या (Pahalgam Terror Attack) हल्ल्यात अनेक पर्यटकांना आपला जीव गमवावा लागलायं. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झालायं. डोंबिवली येथील अतुल मोने आणि त्यांचे नातेवाईक हेमंत जोशी आणि संजय लेले यांचाही या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय लेले यांचा मुलगा हर्षल लेलेने संपूर्ण थरार सांगितलायं.

Abir Gulal Ban In India : पाकिस्तानी अभिनेता फवादच्या ‘अबीर गुलाल’ चित्रपटावर केंद्रानं लादली बंदी

जम्मू काश्मीरला पर्यटनासाठी संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने कुटुंबियांसोबत गेले होते. 21 एप्रिल रोजी ते पहलगाममध्ये दाखल झाले. पहलगाम परिसरात ते फिरत होते. तिन्ही कुटुंब एकमेकांचे फोटो काढण्यात व्यस्त होते. यावेळी अचानक गोळीबार झाल्याचा आवाज आला. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच तिथं दहशतवादी दाखल झाले. दहशतवादी येताच लेले यांच्या मामांनी आम्हाला जाऊ द्या, आम्ही काहीच करत नाही, अशी विनवणी दहशतवाद्यांना केली. मात्र, अतुल मोने यांनी तोंडातून शब्द काढताच त्यांच्यावर गोळ्या झाडल्याचं हर्षल लेलेंनी सांगितलंय.

आमच्यासमोर मामा अतुल मोने यांना गोळ्या झाडल्यानंतर आम्ही घाबरुन गेलो होतो. दहशतवाद्यांनी मामा अतुल मोने यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर हर्षल लेले यांचे वडिल संजय लेले यांनी आपले हात वर केले. लेलेंनी हात वर करताच दहशतवाद्यांनी गोळी झाडली. त्यावेळी हर्षलचा हात वडिलांच्या डोक्याजवळ होता, त्याला वाटलं हाताला गोळी लागली.,हर्षल खाली पडला, त्यानंतर हर्षल जेव्हा उठला तेव्हा वडिलांचे डोके पूर्ण रक्ताने माखलेले होते, आणि त्यांचा मृत्यू झाला होता, असं हर्षल लेले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय.

यंदाच्या अण्णाभाऊ साठे साहित्यभूषण पुरस्काराचे ‘विक्रम शिंदे’ ठरले मानकरी! कमी वयात भरीव योगदान…

हिंदु-मुस्लिमांनी वेगवेगळं व्हा…
तिन्ही कुटुंबिय खुल्या मैदानात फोटो काढत असतानाच दहशतवादी आले. दहशतवादी आल्यानंतर त्यांनी हिंदू मुस्लिमांनी वेगवेगळं व्हा, असं सांगितलं होतं. दहशतवाद्यांनी सलग तीनवेळा असं विचारलं. त्यानंतर कोणीही काहीच न बोलल्याने त्यांनी गोळीबार केला, असल्याचा दावा मोने कुटुंबियांनी केलायं.

या हल्ल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच दहशतवादी निघून गेले. त्यानंतर स्थानिक लोकांनी आम्हाला त्या ठिकाणावरुन दुसरीकडे पाठवले. आमच्यासोबत अनेक महिला होत्या, त्यांनी घोड्यावरुन खाली पाठवले. आम्ही चालत आलो. त्यानंतर आमच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. रुग्णालयात केंद्रीय मंत्री अमित शाह सर्वांची चौकशी करत होते. सकाळी मृतांची ओळख पटल्यानंतर या घटनेत आमच्या तिन्ही नातेवाईकांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यता आलं. या हल्ल्यात गोळीबार करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना मी स्वत: पाहिले असल्याचं हर्षल लेले यांनी सांगितलंय.

तुम्ही पर्यटक दहशत माजवण्यास येतात…
अनुष्का मोने यांनी घटनेची माहिती देताना सांगितले की, दुपारी एक ते दीड वाजेची वेळ होती. आम्ही सर्व आनंदात होते. फोटो काढत होते. त्यावेळी दहशतवादी आले. हिंदू कोण विचारले? आमच्या समोर सर्वांना मारले. आम्ही काहीच करु शकले नाही. ते दहशतवादी बोलत होते, तुम्ही या ठिकाणी दहशत माजवण्यास येतात…त्यांचा पर्यटकांवर राग दिसत होता, असे अनुष्का मोने यांनी सांगितले.

follow us