Download App

CM शिंदेंना धक्का! युवासेनेचा शिलेदार हाती घेणार मशाल; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

Eknath Shinde : राज्यात विधानसभा निवडणुका जवळ (Maharashtra Elections) आल्या आहेत. फोडाफोडीच्या राजकारणाने वेग घेतला आहे.  या राजकारणाचा फटका आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना बसला आहे. शिंदेंच्या युवासेनेचे सचिव दीपेश म्हात्रे धनुष्यबाणाची साथ सोडणार असून ठाकरेंची मशाल हाती घेणार आहेत. म्हात्रे आजच उद्धव ठाकरे यांच्या (Uddhav Thackeray) उपस्थितीत शिवबंधन हाती बांधणार आहेत. ऐन निवडणुकीच्या आधी ही घटना घडल्याने शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. या राजकारणाचं प्रत्युत्तर आता शिंदे कसे देतात याची उत्सुकता आहे.

एकनाथ शिंदे यांनाही आनंद दिघेंप्रमाणे संपवणारं होते; शिंदे गटाच्या नेत्याने केला खळबळजनक दावा

शिवसेनेत फूट पडली त्यावेळी दीपेश म्हात्रे यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली होती. एकनाथ शिंदे यांनी त्यांना युवासेनेचं सचिवपद दिलं होतं. म्हात्रे येथे प्रभावीपणे काम करत होते. परंतु, आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पुन्हा ठाकरे गटात परतण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्याबरोबर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील चार माजी नगरसेवक आणि काही पदाधिकारी ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री येथे आज दुपारी हा पक्षप्रवेश होणार आहे.

 

follow us