Video : मुंबईत जोगेश्वरीत जेएनएस बिझनेस पार्कमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या जवानांचं मदत कार्य सुरू

या इमारतीचे 4 मजले आगीच्या विळख्यात सापडले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अथक प्रयत्नांनी ही आग आटोक्यात आणण्यात आली.

News Photo (52)

News Photo (52)

मुंबईतील जोगेश्वरी येथील एका इमारतीमध्ये भीषण आग लागली. (Mumbai) आगीचे वृत्त मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. या इमारतीचे 4 मजले आगीच्या विळख्यात सापडले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अथक प्रयत्नांनी ही आग आटोक्यात आणण्यात आली.

जोगेश्वरी पश्चिमेकडील बेहराम बाग जेएनएस बिझनेस पार्कमध्ये ही आग लागली. कमर्शिअल अशा या हाय-राईज बिल्डींमध्ये ही भीषण आग लागली असून आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्न सुरू केले. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. या इमारतीच्या अगदी वरच्या मजल्यावर असलेल्या रहिवाशांकडून मदतीसाठी बचावासाठी हाका मारल्या जात होत्या . त्यांचा जीव वाचवून सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी देखील फायर ब्रिगेडचे जवान कसून प्रयत्न करत होते.

मुंबईची अवस्थाही झाली दिल्लीसारखीच! हवा बिघडली, मुंबईकरांच्या प्रकृतीला मोठा धोका

 

Exit mobile version