Download App

सर्व यंत्रणा बाजूला ठेवून आणि कोणताही दबाव न आणता पक्ष फोडून दाखवावा; उद्धव ठाकरे यांचे एकनाथ शिंदेंना चॅलेंज

Uddhav Thackeray on Eknath Shinde: शिंदे यांनी सर्व यंत्रणा बाजूला ठेवून आणि कोणताही दबाव न आणता पक्ष फोडून दाखवावे.

  • Written By: Last Updated:

Uddhav Thackeray on Eknath Shinde : उद्धव ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray) सहा खासदार हे फुटून पुन्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबरोबर येणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. तर वेगवेगळे दावे केले जात आहे. ठाकरे सेनेच्या खासदारांनी दिल्लीतील पत्रकार परिषद घेत या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. तर आता उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक जाहीर चँलेज दिले आहे. शिंदे यांनी सर्व यंत्रणा बाजूला ठेवून आणि कोणताही दबाव न आणता पक्ष फोडून दाखवावे, असे चँलेज ठाकरे यांनी दिले आहे.

कोट्यवधींना विकले जाणारे लाल चंदन भारतात कुठे मिळते, नामशेष होण्याच्या मार्गावर का आहे?

लाडक्या बहिणींना अपात्र करणारे लाडके भाऊ मतं परत करणार का ? असा हल्लाबोल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर केला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या कार्य अहवालाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे रेनकोट घालून स्नान करायचे अशी टीका करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाकुंभ मेळ्यात गंगेत पूर्ण कपडे घालून स्नान करतात, अशी खिल्ली त्यांनी उडविली. तसेच सतत हिंदुत्वावरून टीका करणाऱ्यांचा ठाकरे यांनी मी भाजपला सोडलं हिंदुत्ववादाला नाही अशा शब्दांत समाचार घेतला. शिवसेनेचे खासदार फोडण्यावरील बातमीवरून ही त्यांनी शिंदेंना सर्व यंत्रणा बाजूला ठेवून आणि कोणताही दबाव न आणता पक्ष फोडुन दाखवा, असे आवाहन देखील केले. मुख्यमंत्रिपद, मंत्री पदे, पालकमंत्री पद यावर सत्ताधाऱ्यांच्या सुरू असलेल्या खेचाखेचीवरूनही त्यांनी चिमटा काढला.

करूणा शर्मांचे चाकणकरांवर आरोप; राज्य महिला आयोगाचा कारवाईचा इशारा

बांगलादेशी नागरिकांना राज्यात रेशनकार्ड उपलब्ध होत असल्यावरून टीका केली. तसेच लोकसंख्यापेक्षा मतदार वाढले कसे यावर प्रश्न उपस्थित करत त्यांना वगळता येणं आता शक्य नसल्याचे म्हणत त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागेल अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. आमच्या पंतप्रधान यांना इतिहास आणि अभ्यासाच वावडं आहे, असे म्हणत पंतप्रधानांनी संसदेत केलेल्या भाषणावर खासदार संजय राऊत यांनी टीका केली. अंबादास दानवे यांच्या कार्य अहवालच्या मुख पृष्ठावर त्यांचेच मनगट आहे, तर काही लोकांना शिवबंधन बांधण्यासाठी मनगट भाड्याने घ्यावे लागतात, अशी टीका राऊत यांनी पक्ष सोडून केलेल्यांवर केली.

काही मिळालं नाही की तू गावात जाऊन बसतोस

उद्धव ठाकरे यांनी पुण्यात पसरवत असलेल्या जीबीएस रोगावरून एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केलाय. ते म्हणाले, पुण्यात जीबीएस नावाचा रोग पसरतो आहे. तो रोग दूषित पाण्यामुळे पसरतो आहे. उत्तर द्यायला महापालिका कुठे आहे? ती विसर्जित झाली आहे. भाजपाकडेच पुणे महापालिका होती. जा मग नगरविकास खात्यात जे धेंड बसवलं आहे ना त्याला विचारा, असा हल्लोबोल केला. त्याला काही मिळालं नाही की तो गावात जाऊन बसतोस आणि रेडा कापतो, पुणेकरांना दुषित पाण्यातून रोग होत आहेत, जबाबदार कोण? मंत्री असणार, दुसरा कोण? आम्हाला काही मिळालं तर आम्ही खुश नाहीतर आम्ही रुसूबाई रुसू, पण जनता शांत आहे, जनता पेटली तर तुमच्या घरात घुसू हेच म्हणेल, असेही ठाकरे म्हणाले.

follow us