Sanjay Raut on Ram temple : आम्हाला भीती वाटते आहे. गोध्रा केलं त्याप्रमाणे राम मंदिराच्या (Ram temple) उद्घाटनाला देशभरातून ट्रेनने लोकांना बोलावलं जाईल. यातील एखाद्या ट्रेनवर हल्ला केला जाईल. गोध्राप्रमाणे (Godhra) धर्मांधतेचा आगडोंब उसळविण्याचा प्रयत्न होईल. जसं पुलवामा (Pulwama) घडले त्याप्रमाणे असाच प्रकार घडेल अशी भीती देशातील प्रमुख विरोधी पक्षांना वाटते, असा हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला.
ते पुढं म्हणाले की बाबरी आणि अयोध्येचा मुद्दा संपलेला आहे. जर तो विषय कोणी काढत असेल तर ते मुर्ख आहेत. सर्वोच्च न्यायालयाने बाबरी आणि आयोध्येचा मुद्दा संपवल्यामुळे तिथे राम मंदिर उभं आहे. याचं श्रेय कोणी घेऊ नये, असा इशारा देखील त्यांनी दिला.
मुंबई-गोवा महामार्गावर मनसेच्या महिला आघाडीची गैरसोय, शालिनी ठाकरेंनी सांगितली आपबीती
या देशात बेरोजगारी, महागाई आहे, चीन घुसलेला आहे अनेक प्रश्न आहेत पण त्याच्याकडे लक्ष न देता धार्मिक तणाव निर्माण करुन निवडणुकीला सामोरे जायचं हा एकच अजेंडा भाजपचा आहे. भाजपकडे 2024 साठी कुठलाही अजेंडा नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली. त्याचवेळी आता देशातील वातावरण बदललंय. आयेगा तो मोदी नही, जाऐगा तो मोदीही, अशी घोषणाही राऊत यांनी दिली.
Crime : शेळीवरुन झाले भांडण; तरुणाने थेट शेजारील महिलेच्या गुप्तांगाचा घेतला चावा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपवर संजय राऊत म्हणाले की गडकरी एक महत्त्वाचे नेते आहेत, कार्यक्षम मंत्री आहेत आणि त्यांचाच काम सध्या देशभरात दिसत आहे. भविष्यातील ते देशाचे नेतृत्व आहे आणि कुणाच्या वाटेत आडवं गेलं तर तिकडे कसं संपविला जातो याचं उदाहरण आम्ही आहोत.
देशातील 27 पक्षांच्या इंडिया आघाडीची बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत होत आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी बैठकीतील महत्वाचे मुद्दे, इंडियाच जागावाटप, लोकसभा निवडणुकीची विरोधी पक्षांची रणनीती अशा महत्त्वाच्या मुद्द्यावर संजय राऊत यांनी संवाद साधला.