Download App

मोठी बातमी! राज्यातील 9 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाहा संपूर्ण यादी…

  • Written By: Last Updated:

Transfers of IAS Officers : राज्य सरकारने राज्यातील 9 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने शुक्रवारी सायंकाळी संबंधित सनदी अधिकाऱ्यांच्या (Chartered Officers)बदल्यांची यादी जाहीर केली. यापैकी 7 अधिकाऱ्यांची सहायक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर राज्यातील विविध जिल्ह्यांतील उपविभागांमध्ये सह-सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून 2 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Mizoram Election : मिझोराम निवडणुकीच्या निकालाची तारीख पुढं ढकलली, आता ‘या’ दिवशी मतमोजणी 

महत्त्वाचे म्हणजे या नियुक्त्या किंवा बदल्या संबंधित अधिकाऱ्यांचे प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर करण्यात आल्या आहेत.

1. आदित्य जीवने, IAS (2021) – फेज-2 प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रकल्प अधिकारी, ITDP, भामरागड-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, अटापल्ली उपविभाग, गडचिरोलीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

2. श्रीमती करिश्मा नायर, IAS (2021) – फेज-2 प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांना सहाय्यक जिल्हाधिकारी, बीड उपविभाग, बीड पदी नियुक्त करण्यात आले आहे.

3. कवाली मेघना, IAS (2021) – फेज-2 प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर परभणीच्या सेलू उपविभागात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

4. विनायक महामुनी, IAS (2021) – फेज-II प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर नंदुरबार उपविभाग, नंदुरबार येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे

5. मिन्नू पीएम, IAS (2021) – फेज-II प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर भातुकाली-तिवसा उपविभाग, अमरावती येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

‘पक्षाची घटना योग्य की अयोग्य? EC चं ठरवणार’; सुनावणीनंतर असीम सरोदेंनी सांगितलं 

6. राहुल कुमार मीना, IAS (2021) – फेज-2 प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रकल्प अधिकारी, ITDP, गडचिरोली-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, गडचिरोली उपविभाग, गडचिरोली या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

7. सत्यम गांधी, IAS (2021) – फेज-2 प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सत्यम यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, देवरी उपविभाग, गोंदिया इथे नियुक्ती करण्यात आली आहे.

8. सुहास गाडे, IAS (2021) – फेज-2 प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांना सहाय्यक जिल्हाधिकारी, पुसद उपविभाग, यवतमाळ म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

9. श्रीमती मानसी, IAS (2021) – फेज-2 प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर बल्लारपूर उपविभाग, चंद्रपूर येथे सहाय्यक जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज