‘पक्षाची घटना योग्य की अयोग्य? EC चं ठरवणार’; सुनावणीनंतर असीम सरोदेंनी सांगितलं

‘पक्षाची घटना योग्य की अयोग्य? EC चं ठरवणार’; सुनावणीनंतर असीम सरोदेंनी सांगितलं

Disqualification Mla : शिवसेना पक्षात बंड झाल्यानंतर एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी समर्थकांसह भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली. मात्र, अपात्र आमदारांच्या प्रकरणाचा अद्यापही निकाल लागलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल विधानसभा अध्यक्षांवर सोपवला आहे. त्यानूसार विधीमंडळात मॅरेथॉन सुनावणी सुरु आहे. आज सुनावणीदरम्यान,शिवसेना पक्षाच्या मुळ घटनेवर युक्तिवाद पार पडला. यावेळी निकाल जर पक्षाच्या घटनेच्या आधारावर होणार असेल तर घटना योग्य की अयोग्य हे निवडणूक आयोगच ठरवणार असल्याचं ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे(Asim Sarode) म्हटलं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर ही सुनावणी पार पडत आहे. सुनावणीनंतर असीम सरोदे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

Ahmednagar News : शनिशिंगणापूर देवस्थानात कोट्यवधींचा भ्रष्टाचार? कारवाईसाठी आमरण उपोषण सुरु

असीम सरोदे म्हणाले, शिवसेनेची मूळ घटना कोणती आणि घटनेच्या आधारे निर्णयाप्रत पोहोचायचं असं असेल तर निवडणूक आयोगाला बोलवावं लागेल. कारण, न्यायाच्या दृष्टीने कोणती घटना मान्य आहे हे निवडणूक आयोगच ठरवू शकतं. परंतु, तो प्रश्न विलंबाशी जोडल्यामुळे उद्धव ठाकरे गटाकडून सांगण्यात आलं की, या अर्जामुळे विलंब होणार असेल तर आम्ही हा अर्ज दाखल करत नाही.

Chhagan Bhujbal : ‘आमची परीक्षा पाहू नका, जातगणना करा ताकदही कळेल’; भुजबळांचा थेट इशारा

परंतु, तो रेकॉर्डवर घेण्यात आला आहे. परंतु, याप्रकरणी निर्णय घेण्यासाठी निवडणूक आयोगालाच बोलवा असं आम्ही सांगितलं होतं. कारण, कोणती घटना योग्य की अयोग्य ठरवण्याचा अधिकार निवडणूक आय़ोगाला आहे, विधानसभा अध्यकांना हा अधिकार नाही, असंही असीम सरोदे म्हणाले आहेत.

Special Screening: ‘संस्कारी बहू’ कतरिनाच्या ‘त्या’ कृत्यानं जिंकली चाहत्यांची मन; व्हिडिओ व्हायरल

सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षावर निकाल दिल्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडेच राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत, विधानसभा अध्यक्षांसमोर विधीमंडळात अपात्र आमदार प्रकरणी सुनावणी पार पडत आहे. सुनावणीत ठाकरे गटाचे व्हीप सुनिल प्रभु यांची सलग उलट चौकशी सुरु आहे. पुढील काही दिवसांत राज्याच्या सत्तासंघर्षाबाबत महत्वाचा निकाल हाती येणार आहे. दरम्यान, आमदार अपात्र प्रकरणी आता उद्या (२ डिसेंबर) सकाळी ११ वाजता सुनावणी होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube