Chhagan Bhujbal : ‘आमची परीक्षा पाहू नका, जातगणना करा ताकदही कळेल’; भुजबळांचा थेट इशारा
Chhagan Bhujbal : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेतेही एकवटू लागले आहेत. अजित पवार गटाचे नेते अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण (Maratha Reservation) देण्यास विरोध केला आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. यानंतर त्यांनी पुन्हा एकदा इशारा दिला आहे. मराठा आरक्षणाला आमचा आजिबात विरोध नाही. मात्र, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण जाहीर करावे. आमचे आम्हाला द्या, आमच्या ताटात वाटेकरी होऊ नका, दबलेल्या पिचलेल्या लोकांना वर आणण्याची आमची भूमिका आहे. आमची परीक्षा पाहू नका. आम्ही सुद्धा लढू शकतो. यासाठी ओबीसींची जातगणना करा. मग आमची ताकद काय आहे ते कळेल, असा थेट इशाराच मंत्री छगन भुजबळ यांनी दिला.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भरत निचिते यांनी उपोषण सुरू केले आहे. उपोषणस्थळी येत छगन भुजबळ यांनी त्यांची भेट घेतली. तसेच आरक्षणाबाबतची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. आरक्षण म्हणजे हा काही गरीबी हटावचा कार्यक्रम नाही. तसेच कुणाचीही लायकी काढून आपण मोठे होत नसतो, असा टोला त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना लगावला.
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ गो बॅक! घोषणाबाजी करत मराठा आंदोलकांनी रस्त्यावर शिंपडलं गोमूत्र
राज्यात अनेक ठिकाणी पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. यावरही भुजबळ यांनी पुन्हा जोरदार टीका केली. ओबीसी समाजाची परीक्षा घेण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. लोकशाही मार्गाने जे आहे ते आम्ही करत राहू. अन्यथा निवडणुकीत प्रत्येकाला त्याची जागा दाखवून देऊ असा इशाराही भुजबळ यांनी यावेळी दिला. आगामी अधिवेशनात ओबीसी जातगणना करण्याचा ठराव घेण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर निचिते यांनी उपोषण मागे घेतले. दरम्यान, भुजबळ यांनी यावेळी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यातच आज जालन्यात मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा होत आहे. या सभेत जरांगे पाटील भुजबळांना काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Manoj Jarange : राजीनामा द्यायला सुद्धा मोठं मन लागतं; जरागेंनी भुजबळांना डिवचलं
राजीनामा द्यायला मोठं मन लागतं – जरांगे
भुजबळांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली होती. महाशक्तीने सांगितले तर राजीनामाही देतो असे भुजबळ काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आज मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार पलटवार केला. राजीनामा द्यायला सुद्धा मोठं मन लागतं, असे म्हणत त्यांनी भुजबळांना पुन्हा डिवचले. राजीनामा द्यायला मोठं मन लागतं. हे पदाला चिटकून बसणारे लोक आहेत. मराठ्यांविषयी गरळ ओकणारे हे लोक आहेत. अशा लोकांना आम्ही काय सल्ला देणार. त्यांचं ते पाहतील. कायद्याच्या पदावर बसून कायदा सुव्यवस्था बिघडवायची. जातीजातीत भेद करायचा. पदाचा गैरवापर करायचा. अशा लोकांना आम्ही महत्वच देत नाही. ते खूप मोठे आहेत त्यांना सल्ला देण्याइतके आम्ही मोठे नाहीत, असे जरांगे पाटील म्हणाले काही दिवसांपूर्वी म्हणाले होते.