Download App

Video : आई.. आई.. करणारा चिमुकलीचा टाहो; पण, डोळ्यांदेखत वाहून गेली आई..

समुद्राच्या लाटा पाहण्यासाठी गेलेले आई अन् बाबा.. लाटांबरोबर फोटो काढण्याची लहर आली.. त्याचवेळी समुद्रातून खवळलेली मोठी लाट काळ बनून आली अन् त्या चिमुकलीच्या डोळ्यांदेखत तिची आई त्या लाटेबरोबर महाकाय समुद्राच्या प्रवाहात गडब झाली, ती कायमचीच.. बाबा मात्र वाचले पण एकटेच. त्या चिमुकलीचा आई.. आई असा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोशच फक्त कानी पडत होता.. हा हृदयद्रावक अन् तितकाच डोळ्यांच्या कडा पाणावणारा प्रसंग मुंबईतील वांद्रे येथील समुद्राच्या किनारी घडला. या प्रसंगाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

व्डिडीओत दिसत आहे की एक जोडपे एका दगडावर बसलेले आहेत. आणि त्यांची मुलगी बाजूला उभी राहून व्हिडीओ बनवत आहे . या व्हिडीओत मुलीचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत आहे. समुद्राच्या लाटा उसळत आहेत. त्यानंतर एक मोठी लाट त्यांच्याकडे येते आणि महिलेला बरोबर घेऊन जाते. मुलगी आणि तिचे वडील ही घटना स्तब्ध होऊन पाहत राहतात. मुलगी आई.. आई म्हणत जोरात टाहो फोडते. पण त्याचा काहीच उपयोग होत नाही. समुद्राच्या पोटात तिची आई वाहून गेलेली असते.

हे कुटुंब मुंबईतीलच रहिवासी आहेत. मुकेश हे एका खासगी संस्थेत टेक्निशिअन म्हणून काम करतात. त्यांनी सांगितले, की मी माझ्या पत्नीला वाचविण्याचा पूर्ण प्रयत्न केला. चौथी मोठी लाट ज्यावेळी आली तेव्हा आमचे संतुलन ढासळले आणि आम्ही दोघेही घसरलो. त्यावेळी मी पत्नीला पकडले. दुसऱ्या एका व्यक्तीने माझा पाय पकडलेला होता. पण, तरीही मी तिला वाचविण्यात यशस्वी ठरू शकलो नाही. माझी मुलेही तिथेच होती. त्यांनी मदतीसाठी खूप प्रयत्न केले. पण, त्याचाही काहीच उपयोग झाला नाही. आता या प्रसंगातून आम्ही कसे सावरू हे काही समजत नाही.

थेट सचिन तेंडुलकर आला बच्चू कडूंच्या रडारवर; CM शिंदेंना पत्र लिहून केली मोठी मागणी

ही घटना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस अग्निशमन विभागासह घटनास्थळी दाखल झाले. बराच वेळ तपास घेतल्यानंतर रविवारी रात्री महिलेचा मृतदेह मिळून आला. उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जाण्यात आले.

 

Tags

follow us