Download App

काँग्रेसमध्ये वेगवान हालचाली; जागावाटपासाठी आज मॅरेथॉन बैठका, पवार-ठाकरेंच्या खेळीने अस्वस्थता

आघाडीतील मित्रपक्षांच्या या वेगवान खेळीने काँग्रेसमध्ये अस्वस्थता वाढली आहे. ज पक्षाच्या दोन बैठका मुंबईत होत आहेत. 

Congress Party Meeting : राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे वारे जोरात (Congress Party Meeting) वाहू लागले आहेत. मतदारसंघ आणि उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. कुणाला किती जागा मिळणार? कुणाला तिकीट मिळणार? याबाबत अजून काहीही निश्चित नाही. तरी देखील महाविकास आघाडीत (MVA) अस्वस्थता वाढली आहे. जागावाटप झालेले नसतानाच ठाकरे गट आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीने काही जागांवर दावा सांगितला आहे. उमेदवारही जाहीर केले जात आहे. आघाडीतील मित्रपक्षांच्या या वेगवान खेळीने काँग्रेसमध्ये अस्वस्थता वाढली आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभुमीवर आज पक्षाच्या दोन महत्वाच्या बैठका मुंबईत (Mumbai News) होत आहेत.

लेट्सअप विश्लेषण : पवार-ठाकरेंची उमेदवार जाहीर करण्याची लगबग; कारणं नेमकी काय?

विधानसभा निवडणुकीतील जागावाटपासाठी आज मुंबईत काँग्रेस पक्षाच्या दोन महत्वाच्या बैठका होत आहेत. काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या उपस्थितीत या बैठका होणार आहेत. मुंबईतील जागांसंदर्भात चर्चा करण्यासाठी मुंबई काँग्रेस कमिटीची बैठका सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार आहे. या बैठकीनंतर दुपारी 12 वाजता दुसरी बैठक होणार आहे. या दोन्ही बैठका मुंबईतील हॉटेल लीला येथे होणार आहेत. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड उपस्थित राहणार आहेत.

मुंबईतील जागावाटपासंदर्भात तीन सदस्यांची एक समिती नियुक्त करण्यात आली आहे. वर्षा गायकवाड, अस्लम शेख आणि भाई जगताप या समितीत आहेत. ही समिती मुंबईतील विधानसभेच्या जागावाटपा बाबत चर्चा करणार आहे. राज्यातील अन्य मतदारसंघांतील जागावाटपासाठी नाना पटोले, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री नितीन राऊत, सतेज पाटील आदी नेते चर्चा करणार आहेत.

अब्दालीचा वंशज इथे येऊन बोंबलून गेला, उद्धव ठाकरेंची भाजपा नेते अमित शाहंवर घणाघाती टीका

दरम्यान, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी जागावाटपावरुन इंडिया आघाडीत वाद सुरू आहे. दुसरीकडे मविआचे दोन बडे नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आपापल्या उमेदवारांची घोषणा करत आहेत. पवार आणि उद्धव यांनी आतापर्यंत 4 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत.विशेष म्हणजे ज्या जागांवर पवार आणि उद्धव यांनी उमेदवार जाहीर केले, त्या जागांवर मित्रपक्षांचीही दावेदारी आहे.

दोन जागांवर ठाकरेंनी दिला उमेदवार

शिवसेनेने (UBT) नाशिकच्या मध्य आणि पश्चिम जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. उद्धव ठाकरे यांनी नाशिक मध्यमधून माजी आमदार वसंत गीते आणि नाशिक पश्चिममधून सुधाकर बडगुजर यांना उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. सध्या या दोन्ही जागांवर भाजपचे आमदार आहेत. 2019 मध्ये नाशिक मध्यमधून देवयानी फरांदे आणि नाशिक पश्चिममधून सीमा हेराई विजयी झाल्या होत्या. विशेष म्हणजे 2019 मध्ये शिवसेनेने या जागांवर उमेदवार उभे केले नव्हते. 2019 मध्ये भाजपचा नाशिक मध्यमध्ये काँग्रेस आणि नाशिक पश्चिममध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा सामना झाला होता.

follow us