माझ्यासोबत सत्तेत असताना दादा नाराज नव्हते; उद्धव ठाकरेंचे थेट मर्मावर बोट

मुंबई : राष्ट्रवादीला खिंडार पाडत शिंदे-फडणवीस सरकारसोबत हातमिळवणी करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) सरकारच्या काही बैठकांना गैरहजर होते. त्यामुळे अजितदादा नाराज असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. या मुद्द्यावरून राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्ध ठाकरेंनी (Uddhav Thackeray) थेट मर्मावर बोट ठेवत माझ्यासोबत सत्तेत असताना दादा नाराज नव्हते असे म्हणत हल्लाबोल केला आहे. ते पत्रकार परिषदेत […]

Letsupp Image   2023 10 06T162407.442

Letsupp Image 2023 10 06T162407.442

मुंबई : राष्ट्रवादीला खिंडार पाडत शिंदे-फडणवीस सरकारसोबत हातमिळवणी करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) सरकारच्या काही बैठकांना गैरहजर होते. त्यामुळे अजितदादा नाराज असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. या मुद्द्यावरून राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्ध ठाकरेंनी (Uddhav Thackeray) थेट मर्मावर बोट ठेवत माझ्यासोबत सत्तेत असताना दादा नाराज नव्हते असे म्हणत हल्लाबोल केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. (Uddhav Thackeray On Ajit Pawar )

राष्ट्रवादीच्या चिन्हाची सुनवाणी सुरु, स्वत: शरद पवार निवडणूक आयोगाच्या कार्यलयात उपस्थित

तुम्ही मुख्यमंत्री असताना दादा नाराज असायच का? असा प्रश्न ठाकरेंना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना ठाकरेंनी जोरदार फटकेबाजी केली. ते म्हणाले की, माझ्यासोबत सत्तेत असताना दादांनी मी कधीच नाराज नसायचे. ते चांगलं काम करत होते म्हणून अनेकांना पोटदुखी होती. मात्र, आता त्यांच्याच उरावर दादा जाऊन बसले असल्याचे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. आता ते नव्हे तर त्यांच्यामुळे जे नाराज होते, त्यांना विचारा असे ठाकरे म्हणाले.

तोंडाला मस्क लावून घरात नोटा मोजत होते, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

मी मुख्यमंत्री असताना केलेल्या कामाचे कौतुक जागतिक यंत्रणेने केले आहे. ते माझे कौतुक नाही तर, ते यंत्रणेने केलेल्या कामाचे कौतुक असल्याचे ठाकरे म्हणाले. दसरा मेळाव्यात मी सविस्तर बोलणार असल्याचे म्हणत आज मी उद्विग्न असून, आरोग्य यंत्रणेचे बारा वाजले आहेत. ते पाहिल्यावर संताप येतो.

कोरोना संकट असताना मी मुख्यमंत्री होतो. महाराष्ट्र तोच आहे, आरोग्य यंत्रणा तीच आहे हे सांगत जग व्यापून टाकलेल्या कोरोना संकटाचा सामना ज्या यंत्रणेने केला, त्याच यंत्रणेची दुर्दशा सरकार बदलल्यामुळे झाल्याची टीका नांदेड, नागपूर आणि छ. संभाजीनगरमधील रूग्णांच्या मृत्यूवर बोलताना ठाकरेंनी केली. मुख्यमंत्री व पंतप्रधान औषध योजना कुणासाठी असा सवाल करत ही बिले कुणाची मंजूर केली जात आहे असे म्हणत  आता राज्यात भ्रष्टाचाराची साथ आहे. एवढेच नव्हे तर, औषध खरेदीसाठी आता रेटकार्ड ठरवले जात असल्याचे कानावर येत असल्याचेही यावेळी ठाकरे म्हणाले. आता ठाकरेंच्या या टीकेवर शिंदे गटाकडून आणि भाजप नेत्यांकडून काय प्रत्युत्तर दिले जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Exit mobile version