राष्ट्रवादीच्या चिन्हाची सुनवाणी सुरु, स्वत: शरद पवार निवडणूक आयोगाच्या कार्यलयात उपस्थित

राष्ट्रवादीच्या चिन्हाची सुनवाणी सुरु, स्वत: शरद पवार निवडणूक आयोगाच्या कार्यलयात उपस्थित

Sharad Pawar Vs Ajit Pawar : राष्ट्रवादीतील (NCP) फुटीनंतर दोन्ही गटांनी पक्षावर दावा केला होता. त्यानंतर हे प्रकरण निवडणूक आयोगात गेले आहे. आज या प्रकरणावर सुनावणी सुरु आहे. आपला दावा मजबूत करण्यासाठी स्वत: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) निवडणूक आयोगाच्या कार्यलयात (Election Commission) उपस्थित आहेत. शिवसेने पाठोपाठ आता राष्ट्रवादीतील चिन्हाची लढाई सुरु झाली आहे.

दिल्लीच्या निवडणुक आयोगाच्या कार्यालयात मोठ्या नाट्यमय घडामोडी घडत आहेत. शरद पवारांना उपस्थित राहण्याची आवश्यकता नव्हती. नैतिक दबाब किंवा आपला पक्ष आहे आणि आपल्या चिन्हावर दावा मजबूत करण्यासाठी स्वत: शरद पवार आयोगाच्या कार्यालयात पोहचले आहेत. आज सुनावणीचा पहिलाच दिवस आहे. या सुनावणीला खासदार शरद पवार यांच्यासोबत आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार वंदना चव्हाण देखील उपस्थित आहेत.

तोंडाला मस्क लावून घरात नोटा मोजत होते, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

शरद पवार गटाकडून अभिषेक मनु सिंघवी युक्तीवाद करणार आहेत. पक्षावर दावा अजित पवार गटाने केला आहे. त्यामुळे पहिला युक्तीवाद अजित पवार गटाकडून केला जात आहे. अजित पवार गटाकडून कोणताही नेता आयोगाच्या कार्यालयात उपस्थित नाही.

अजितदादांचं टेन्शन वाढलं! शरद पवार गटाने टाकला डाव; सर्वोच्च न्यायालयात..,

यापूर्वी समाजवादी पक्षात फूट पडली होती तेव्हा चिन्हाचा वाद सुरु होता. त्यावेळी मुलायम सिंग यादव देखील स्वत: निवडणूक आयोगाच्या कार्यालयात उपस्थित होते. त्यावेळीचा निकाल त्यांच्या विरोधात गेला होता. या वयात मुलायम सिंग यादव यांचे आयोगाच्या कार्यालयात येणं याची खूप चर्चा झाली होती. तशाच प्रकारचे नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी शरद पवार निवडणूक आयोगाच्या कार्यालयात दाखल झाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube