Uddhav Thackeray : बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त आज मुंबईत ठाकरे गटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलतांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. मराठी माणसाच्या नादी लागू नका, अमित शाह (Amit Shah) किस झाड की पत्ती है, असं म्हणत त्यांनी गृहमंत्री शाह यांच्यावर निशाणा साधला.
‘रुसू बाई रुसू गावी जाऊ बसू म्हणत ठाकरेंचा शिंदेंना टोला अन् तुफान फटकेबाजी
अंधेरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयमवर ठाकरे गटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला संबोधित करतांना ठाकरे म्हणाले की, गद्दारांनी वार केले तरी उद्धव ठाकरे संपणार नाही. गद्दारांना गाडूनच मी संपेलं. जेव्हा एखादा निष्ठावंत शिवसैनिक म्हणेल की मी विचार सोडले, तेव्हा मी माझं पद सोडले. महाराष्ट्रातील लोक मला कुटुंब मानतात. कुटुंबातील सदस्य मानतात. तो महाराष्ट्र आणि मुंबईकर माझ्या जीवाला जीवच देईल, असं ठाकरे म्हणाले.
यावेळी ठाकरेंनी अमित शाह यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, अमित शाह असं म्हणाले, महाराष्ट्रातील विजय उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखणारा आहे. शाहजी, वाघ काय असतो आणि पंजा काय असतो, हे येत्या काळात दिसेल. मराठी माणसाच्या नादी लागू नका. जिथे औरंगजेबाला झुकवलं. तिथं अमित शाह किस झाड कि पत्ती है, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
अमित शाह किस झाड की पत्ती, मराठी माणसांचा नाद करू नका; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
पाठीत वार केला की वाघ नखं काढू
ठाकरे म्हणाले, अमित शाह परत उद्या येताय. त्यांचा समाचार तर घेणार, मी सोडणार नाही. पाठीत वार केला की वाघ नखं काढू. मिठी मारली तर प्रेमाने मारू. दगाबाजी केली तर वाघनखं काढू. हा महाराष्ट्र आहे. ही महाराष्ट्राची शिकवण आहे, असं ठाकरे म्हणाले.
दगाबाजीचे बीजे तुमच्यात…
अमित शाह सांगतात की, शरद पवार यांना २० फूट खड्डात गाडण्याचं काम केलं. मात्र, १९७८ मध्ये पवार यांनी पुलोदचा प्रयोग केला होता. तेव्हा जी दगाबाजी झाली होती, त्याचं दबाबाजी सरकारमध्ये जनसंघ होता. शाहजी, दगाबाजीचे बीजं तुमच्यात आहेत, अशी टीका ठाकरेंनी केली.
गद्दारांना जिंकवणारे अमित शाह
यावेळी ठाकरेंनी शिंदे गटाचाही समाचार घेतला. आज आपण उपनगरात सभा घेतोय. तर वांद्रेला गद्दारांचा मेळावा सुरू आहे. या गद्दारांना जिंकवणारे अमित शाह आहेत. अडीच वर्ष सर्व सत्ता वापरून शाह यांनी आपल्यावर घटनाबाह्य सरकार बसवलं. ते आपल्या हातातून महाराष्ट्र जाऊ देतील? ज्या क्षणी महाराष्ट्र हातून जाईल, तेव्हा दिल्ली कोलमडेल, असं ठाकरे म्हणाले.
भाजपवाल्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. शिवसैनिक अस्वस्थ रुग्णाला जातपात न पाहता रक्तदान करतील. पण जर संघाचे लोक असतील तर म्हणतील तर रक्त नव्हे, आम्ही गोमूत्र देतो, अशी टीकाही ठाकरेंनी केली.