‘रुसू बाई रुसू गावी जाऊ बसू म्हणत ठाकरेंचा शिंदेंना टोला अन् तुफान फटकेबाजी

  • Written By: Published:
‘रुसू बाई रुसू गावी जाऊ बसू म्हणत ठाकरेंचा शिंदेंना टोला अन् तुफान फटकेबाजी

Uddhav Thackeray On Eknath Shinde : पालकमंत्र्यांची यादी जाहीर होताच महायुतीत (Mahayuti) धुसफूस सुरु झाली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) देखील नाराज असून ते पुन्हा दरेगावी गेले आहे. यावरून आता राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदे यांना जोरदार टोला लावला आहे. अंधेरी येथे आयोजित मेळाव्यात बोलताना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तुफान फटकेबाजी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. या मेळाव्यात बोलताना रुसू बाई रुसू गावी जाऊ बसू म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लावला.

या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, जेव्हापर्यंत अमित शाह आहे तोपर्यंत तुमचं महत्व आहे. एकदा महानगरपालिका निवडणुका होऊ द्या त्यानंतर बघू. आता बसायचे तर बसा नाहीतर गावी निघून जा, रुसू बाई रुसू गावी जाऊ बसू असं यांचं झालं आहे. असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लावला. तसेच उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्यात बोलताना आरएसएसची देखील खिल्ली उडवली.

विधानसभा निवडणुकीत आरएसएसने राज्यात 90 हजार लोक आणले होते मात्र आता आरएसएसकडे रक्त मागितले तर ते म्हणतील रक्त नव्हे आम्ही गोमूत्र देऊ. असं म्हणत त्यांनी आरएसएसची खिल्ली उडवली. तर अमित शाह यांनी अडीच वर्ष सर्व सरकारी यंत्रणा वापरून सरकार आपल्यावर लादलं असा आरोप देखील यावेळी केला. तसेच आम्ही हिंदुत्व सोडल नाही आणि सोडणारही नाही असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

पाटील की देशमुख, राज्यात काँग्रेसची ‘कमांड’ कोणाला? ‘या’ दिवशी होणार घोषणा

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, जर भाजपला देशप्रेमी मुस्लिमांना विरोध असेल तर अमित शाह यांनी भाजपच्या झेंडेमधील हिरवा रंग काढून दाखवावा असं मी त्यांना आव्हान करतो. असेही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube