Download App

आमच्याकडे बसलेत तीन हिरो, कमळा पसंतवाले; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

  • Written By: Last Updated:

मुंबई: शिवतीर्थावर झालेल्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी राज्य सरकार, शिंदे गट आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्य सरकारवर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी एका जाहिरातीचा उल्लेख केला आहे. जाहिरातीतील तीन हिरो हे दोन बोटे दाखवून कमला पसंतची जाहिरात करतात. आपल्याकडे तिघे बसलेले आहेत. त्यातील दोन हाफ आहेत. ते कमला पसंतवाले आहेत. हे कमळा पसंतवाले आहेत. तुम्ही आमच्या नादाला लागू नका, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिलाय.

‘आम्हीच आग आम्हीच भिंत, छाटू तुमचे पंख’; शेरोशायरी करीत दानवेंनी शिंदे गटाला ललकारलं

ठाकरे म्हणाले, मेळावा झाल्यानंतर खोकेसुराचे दहन करणार आहे. रामाने रावणाचे दहन केले होते. रावण ही शिवभक्त होता. तरीही रामाला त्याला मारावे लागले. कारण रावण माजला होता. आज सुद्धा शिवसेना पळविण्याचा प्रयत्न झाला आहे. आपण आता खबरदारी घेतली पाहिजे. हनुमानाने रावणाची लंका दहन केली होती. तसेच खोक्याची लंका दहन करणाऱ्या मशाली माझ्याकडे आहेत.

Marathi Movie : ती येतीय… ‘निळावंती’ चं उत्कंठावर्धक पोस्टर प्रदर्शित

मराठा आरक्षणावर उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात आणि देशात खूप प्रश्न आहेत. मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या जरांगे पाटलांना मी धन्यवाद देतो कारण त्यांनी अत्यंत समजुतदारपणे आंदोलन सुरू केले. आज त्यांनी धनगरांना साद घातली आहे हे चांगले काम केले आहे. जालन्यामध्ये शांततेत आंदोलन करणाऱ्यांवर डायर सरकारने लाठीचार्ज केला आहे. माझ्या काळातही हा प्रश्न होता. तेव्हा पोलिस असे वागले नाहीत. पोलिस रानटी कसे होऊ शकतात. आदेशाशिवाय ते वेडेवाकडे वागू शकत नाही, असे म्हणत ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली.

आरक्षणाचा प्रश्न लोकसभेत सोडवावा लागणार
आरक्षणाचा प्रश्न लोकसभेमध्ये सोडावा लागणार आहे. एेन गणपतीची काळात लोकसभेचे खास अधिवेशनात झाले. कोर्टाचा निर्णय फिरविण्याचा अधिकार संसदेला आहे. दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा अधिकार संसदेने फिरविला आहे. तसाच धनगर, मराठ्यांसाठी व इतरांसाठी घ्या, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.

Tags

follow us