युती कधी होणार? नार्वेकरांचा सवाल, चंद्रकांतदादांच्या उत्तराने शिंदे गटाला धक्का..

एका लग्न सोहळ्यात चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंशी मनमोकळ्या गप्पा मारताना दिसून आले. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

Uddhav Thackeray And Chandrakant Patil

Uddhav Thackeray And Chandrakant Patil

Mumbai News : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं पानिपत झालं. ठाकरे गटाला मोठा झटका बसला. तर दुसरीकडे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला गळती लागली. यातच ठाकरे गट आणि भाजपाची युती होईल अशाही चर्चा सुरू झाल्या आहेत. खरंच अशी युती होणार का याचं उत्तर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे. आमदार पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्नात उद्धव ठाकरे हजर होते. याच लग्नात भाजप नेतेही उपस्थित होते. या ठिकाणी चंद्रकांत पाटील आणि मिलींद नार्वेकर यांच्यात काही काळ संवाद झाला. त्यानंतर या चर्चांना अधिक बळ मिळालं.

या लग्न सोहळ्यात चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंशी मनमोकळ्या गप्पा मारताना दिसून आले. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. याच ठिकाणी मिलींद नार्वेकरही होते. त्यांनी हसत हसत युती कधी होणार असा सवाल पाटलांना विचारला. त्यावर चंद्रकांत पाटील यांनीही मिश्कील उत्तर देत मीही त्याच सुवर्णक्षणाची वाट पाहतोय असे उत्तर दिले. त्यांच्या या उत्तराने एकच हास्यकल्लोळ उडाला.

आदित्य ठाकरे अन् उद्धव ठाकरे जुन्या कॅसेट, त्यांनी भूतकाळात न जाता.. बावनकुळेंचा टोला

काय झाला संवाद?

या विवाह सोहळ्यात गप्पा सुरू असताना मिलींद नार्वेकरांनी विचारलं युती कधी होतेय ? त्यावर चंद्रकांत पाटलांनी लगेचच तो माझ्यासाठी सर्वात सुवर्णक्षण असेल असे उत्तर दिले. यानंतर दोघेही हसू लागले तेवढ्यात उद्धव ठाकरेंनी विचारलं अरे काय कुजबुजताय? त्यावर पाटील म्हणाले मी हेच म्हणत होतो की युती होईल तो माझ्यासाठी सुवर्णक्षण असेल. त्यांच्या या उत्तरावर येथे उपस्थित सगळेच जोरजोरात हसू लागले.

Exit mobile version