आदित्य ठाकरे अन् उद्धव ठाकरे जुन्या कॅसेट, त्यांनी भूतकाळात न जाता…; बावनकुळेंचा टोला

  • Written By: Published:
आदित्य ठाकरे अन् उद्धव ठाकरे जुन्या कॅसेट, त्यांनी भूतकाळात न जाता…; बावनकुळेंचा टोला

Chandrashekhar Bawankule : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) आज महायुती सरकारसह (Mahayuti) अदाणी समूहावरही (Adani) जोरदार टीका केली. मुंबईवर आता वेगळा कर येणार आहे. तो म्हणजे अदाणी कर. आपण कर भरतो आणि त्याचा फायदा अदाणींना होतो, अशी टीका त्यांनी केली. त्यांच्या या टीकेला आता मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) प्रतिक्रिया दिली.

मंत्रिमंडळ बैठक अन् व्हिसीद्वारे उपस्थिती, एकनाथ शिंदे पुन्हा नाराज? शंभूराज देसाईंनी स्पष्ट सांगितलं 

चंद्रशेखर बावनकुळेंनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. आदित्य ठाकरेंच्या वक्तव्याविषयी विचारलं असता ते म्हणाले की, आता या कॅसेट फार जुन्या झाल्या आहेत. आदित्य ठाकरे आणि उध्दव ठाकरे फक्त तुम्ही टीआरपी देताय म्हणून बोलतात. आता त्यांच्याकडे बोलायला काही शिल्लक काही नाही, कारण उद्धव ठाकरेंनी अडीच वर्ष घरी बसून सरकारलं चालवलं, ते दोनच दिवस मंत्रायलात आले. त्यामुळं ते आमच्या सरकारवर बोलू शकत नाही. मग अदानीचा मुद्दा आणि महायुती सरकारला जोडून ते वाटेल ते बरळत असतात, अशी टीका बावनकुळेंनी केली.

Mahakumbh : आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू, CM योगी आदित्यनाथ यांच्याकडून प्रत्येकी 25 लाखांची मदत जाहीर… 

मला शिंदे गटाकडून ऑफर देण्यात आली होती असं विधान चंद्रकांत खैरेंनी केलं होतं. त्यावरही बावनकुळेनी भाष्य केलं. ते म्हणाले, मला वाटतं, विरोधकांनी भूतकाळात काय झालं, यात न जाता सरकारकडून विधायक करून घेतली पाहिजे. मीडिया स्पेसचा चांगला वापर करून घेतला पाहिजे. सनसनाटी वक्तव्ये करून राजकीय पोळी शेकण्यात काही काही अर्थ नाही. महाराष्ट्राच्या जनतेला जसं विकासाकडे नेणारं सरकार अपेक्षित असतं, तसंच सरकारकडून विकास कामं करून घेणारे विरोधक हवे असतात.

रायगडच्या पालकमंत्रीपद राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंना देण्यात आलं होतं. मात्र, गोगावले यांच्या समर्थकांनी नाराजी यावर व्यक्त केली होती. त्यामुळं रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगित देण्यात आली. याविषयी बावनकुळेंना विचारलं असता ते म्हणाले की, मबहायुतीचे तीनही नेते यावर बोलतील. लवकरच रायगडच्या पालकमंत्रीदावर तोडगा निघेल, असं बावनकुळे म्हणाले.

मनोज जरांगे पाटील उपोषण थांबवण्याचा निर्णय जरांगेंनी घेतलाय.यावरही बावनकुळेंनी भाष्य केलं. ते म्हणाले, जरांगे पाटलांना आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे. आमचं काम मराठा समाजाला न्याय देण्याचे आहे आणि सरकार मराठा समाजाला न्याय देण्यासाठी कायम प्रयत्नशील आहे.

बीड चांगले होते, बीड पुढेही चांगलेच राहील. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रत्येक आरोपीला कडक शिक्षा होणार आहे. सरकार कुणालाही सोडणार नाही. या विषयात राजकारण करण्याची गरज नाही, असंही बावनकुळे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube