Download App

लोकसभेच्या आखणीत ठाकरेंची सावध पावलं : पवारांशी मैत्री जपण्यासाठी दोन ‘विश्वासूंवर’ खास जबाबदारी

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकाच्या दृष्टीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून 10 शिलेदारांवर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या दहा नेत्यांची महाराष्ट्रातील विविध लोकसभा मतदारसंघांचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, राजन विचारे, विनायक राऊत, माजी खासदार चंद्रकांत खैरे, अनंत गीते, आमदार रवींद्र वायकर, सुनिल प्रभू आणि भास्कर जाधव या दहा नेत्यांची 42 लोकसभा मतदार संघाची जबाबदारी दिली आहे. मुंबईतील सहा मतदारसंघ मात्र कोणत्याच नेत्याकडे देण्यात आले नाहीत. (Uddhav Thackeray gave the responsibility of 15 to 16 constituencies dominated by NCP to two leaders MP Sanjay Raut and MP Anil Desai.)

त्याचवेळी या नियुक्त्या करताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काहीशी सावध पावलं टाकल्याचेही दिसून येत आहे. राष्ट्रवादीचा प्रभाव असलेल्या पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील 17 लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी खासदार संजय राऊत आणि खासदार अनिल देसाई या दोन विश्वासू नेत्यांवर त्यांनी दिली आहे. यातील संजय राऊत यांच्याकडे तर बारामती, पुणे, शिरुरसह तब्बल 12 मतदारसंघांची धुरा सोपविली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यातही विशेषतः शरद पवार यांच्याशी असलेली मैत्री जपण्यासाठी ठाकरे यांनी या दोन विश्वासू नेत्यांना ही जबाबदारी दिली असल्याचे सांगण्यात येते.

17 लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी खासदार संजय राऊत आणि खासदार अनिल देसाई यांच्यावर :

खासदार संजय राऊत, उत्तर महाराष्ट्र आणि पुणे :

लोकसभा मतदारसंघ : नाशिक, दिंडोरी, जळगाव, रावेर, धुळे, नंदुरबार, नगर, शिर्डी, पुणे, बारामती, शिरूर, मावळ (विधानसभा पिंपरी, चिंचवड, मावळ)

खासदार अनिल देसाई, पश्चिम महाराष्ट्र :

सातारा, माढा, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी

इतर महाराष्ट्रात कोणत्या नेत्यावर कोणत्या मतदारसंघाची जबाबदारी?

खासदार राजन विचारे, कोकण (ठाणे, पालघर) :

लोकसभा मतदारसंघ : ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर

अनंत गीते, कोकण (रायगड) :

लोकसभा मतदारसंघ : रायगड, मावळ (विधानसभा पनवेल, कर्जत, उरण )

खासदार विनायक राऊत, कोकण (रत्नागिरी, सिंधुदुर्ग) :

लोकसभा मतदारसंघ : रत्नागिरी, सिंधुदुर्ग

चंद्रकांत खैरे, मराठवाडा :

लोकसभा मतदारसंघ : संभाजीनगर, जालना

खासदार अरविंद सावंत, पश्चिम विदर्भ :

लोकसभा मतदारसंघ : बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, वर्धा

आमदार भास्कर जाधव, पूर्व विदर्भ :

लोकसभा मतदारसंघ : नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर

आमदार रवींद्र वायकर, मराठवाडा :

लोकसभा मतदारसंघ : नांदेड, हिंगोली, परभणी

आमदार सुनील प्रभू, मराठवाडा, सोलापूर :

लोकसभा मतदारसंघ : सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड

follow us