Download App

Uddhav Thackeray : ‘पंतप्रधान असताना मोदींनी काय केलं?’ ठाकरे गटाचा थेट सवाल

Uddhav Thackeray : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन (PM Modi) दिवसांपूर्वी शिर्डीत आले होते. येथे त्यांनी विविध विकासकामांचे उद्घाटन केले. तसेच शेतकरी मेळाव्यात भाषण करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. शरद पवार यांचा नामोल्लेख टाळत मोदी म्हणाले होते, महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ नेत्याने शेतकऱ्यांच्या नावाने आयुष्यभर फक्त राजकारण केले. ते अनेक वर्षे केंद्रात कृषिमंत्री होते. परंतु, त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले. त्यांच्या याच वक्तव्यावर आज ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) सामनाच्या लेखातून जोरदार हल्लाबोल करत मोदींना काही टोचणारे सवाल केले आहेत.

मोठ्या उद्योगपतींनी बँकांची कर्जे बुडवली. मोदींच्या सरकारने ही कर्जे माफ केली पण, शेतकऱ्यांच्या पाच-दहा हजारांच्या कर्जासाठी त्यांच्या घरांवर टाच आली. भाजपास पैसे देणाऱ्या उद्योगपतींनी बँकांची कर्जे बुडवून परदेशात पलायन केले. हे मोदींच्या राज्यात घडत आहे. अनेक प्रतिष्ठित लोक, व्यापारी या देशात राहणे नको म्हणून वैतागून दुसऱ्या देशात पलायन करत आहेत. हा देश राहण्यालायक ठेवला नाही. लोक भयग्रस्त आहेत, शेतकरी आत्महत्या करत आहेत. तरुणांना निराशेने ग्रासले आहे. पंतप्रधान असताना मोदींनी काय केले? असा सवाल ठाकरे गटाने विचारला आहे.

Sanjay Raut : ‘आधी गुलाम आहोत स्पष्ट करा, टीका थांबवतो’; राऊतांनी CM शिंदेंना डिवचलं

आधी काय बोललो ते एकदा तपासा 

मोदी शिर्डीत आले व पुन्हा एकदा खोटे बोलून गेले. मोदी यांनी पवार यांच्याबाबत आपण आधी काय बोललो हे तपासून घ्यायला हवे होते. खरंतर मोदी सरकारनेच शरद पवार यांना कृषी व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल देशातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण दिला व आता मोदी नेमके उलटे बोलत आहेत. गोंधळलेल्या मानसिकतेचे हे लक्षण आहे, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

देशाला त्यांनी काय दिले. त्यांना शेतीतले किती कळत होते. सध्याचे कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना तर मोदी यांनी मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत उतरवले. कृषिमंत्री पदाविषयी मोदी यांची ही आस्था आहे. कृषिमंत्री तोमर हे चंबळ खोऱ्यातील त्यांच्या विधानसभा निवडणुकीत अडकून पडले आहेत व देशाचे कृषी मंत्रालय वाऱ्यावर आहे. मोदी यांच्या कारकीर्दित चार-पाच कृषिमंत्री झाले. युपीए काळात सलग दहा वर्षे शरद पवार हेच देशाचे कृषिमंत्री होते. चार-पाच वर्षांपूर्वी मोदी हे पवार यांच्या कृषी क्षेत्रातील कार्याचे व नेतृत्व गुणांचे कौतुक करत होते.

आरक्षणाचा प्रश्न BJP मुळेच चिघळला, फडणवीसांनी मराठा, धनगर समाजाला फसवलं; पटोलेंची घणाघाती टीका

पंतप्रधानांना शरद पवारांचे भय वाटते 

पवार कृषिमंत्री असताना त्यांच्या गुजरातला कशी मदत करत होते, त्याचे कीर्तन करत होते. पवार यांच बोट धरून आपण राजकारणात आलो वगैरे पुड्या सोडत होते. आज त्यांच्या भूमिका बदलल्या आहेत. मोदी यांच्या बोलण्यात आणि वागण्यात आगापिछा नसतो. चार महिन्यांपूर्वी त्यांनी अजित पवारांवर 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा व शिखर बँकेच्या घोटाळ्याचे आरोप केले होते. काल शिर्डीत तेच अजित पवार मोदी यांच्या शेजारी भाजप पुरस्कृत उपमुख्यमंत्री म्हणून बसले. अजित पवारांसमोरच मोदी शरद पवारांची बदनामी करत होते. अजित पवारांना फोडले तरी 82 वर्षांचे पवार अजून मैदानात आहेत. याचे भय पंतप्रधानांना वाटते. मोदी यांनी देशासाठी काय केले हा प्रश्न त्यांना विचारायला हवा.

follow us