Download App

रविवारी सरकारविरोधात जोडे मारो आंदोलन; ठाकरे-राणे वादानंतर उद्धव ठाकरेंची घोषणा

रविवारी महाविकास आघाडी मुंबईत मोठा मोर्चा काढणार आहे, सरकारविरोदात जोडे मारो आंदोलनाची घोषणाही उद्धव ठाकरेंनी केली. 

Uddhav Thackeray : आज राजकोट किल्ला परिसरात मोठा राडा झाला. येथे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि माजी मंत्री नारायण राणेंचे (Narayan Rane) कार्यकर्ते भिडले. त्यामुळे दगडफेक आणि धक्काबुक्कीच्या घटना घडल्या. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा रस्ता मालवणमध्येच अडवण्यात आला. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील महायुती सरकारवर घणाघाती टीका केली. मोदी शहांच्या दलालांनी मालवणमध्ये आमचा रस्ता अडवला. महायुतीच्या सरकारमध्ये मोठे घोटाळे होत आहेत. स्मारकाच्या कामातही मोठा भ्रष्टाचार झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा कोसळण्याची घटना याआधी कधीच घडली नाही. आता पुतळ्यासाठी पुन्हा टेंडर काढणार त्यातही घोटाळा करणार अशा कठोर शब्दांत उद्धव ठाकरेंनी सरकारवर (Uddhav Thackeray) टीका केली.

येत्या रविवारी महाविकास आघाडी मुंबईत मोठा मोर्चा काढणार आहे, अशी घोषणाही त्यांनी केली. ठाकरे आणि नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यातील वादानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, महायुती सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला. शिवरायांचा पुतळा कोसळण्यासारखी घटना याआधी कधीच घडली नाही. मोर्चात मोदी शहांचे दलाल रस्ता अडवून बसले होते.

Shivaji Maharaj Statue : ठाकरे गट अन् राणे समर्थक आमने-सामने; राजकोट किल्ल्यावर मोठा राडा

स्मारकाच्या कामात कोट्यावधींचा घोटाळा झाला आहे. आता पुतळा उभारण्याचं टेंडर काढून पुन्हा घोटाळा करणार आहेत. मंत्री दीपक केसरकर यांनी जे वक्तव्य केलं ते देखील संतापजनकच आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. आता या सगळ्या प्रकारच्या निषेधार्थ येत्या 1 सप्टेंबरला मुंबईत महाविकास आघाडीच्यावतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. हुतात्मा स्मारक ते इंडिया गेट असा हा मोर्चा राहिल. या मोर्चात तिन्ही पक्षांतील शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी यावेळी दिली.

 

follow us