Uddhav Thackeray Press Conference : धारावीकरांना त्यांचं घर जिथल्या तिथं मिळालं पाहिजे. फसव्या योजनांमागे काँट्रॅक्टर मित्रांचं भलं करण्याचा यांचा डाव आहे. मुंबईला अदानी सिटी करण्याचाही यांचा डाव आहे. पण आम्ही हे कधीच होऊ देणार नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं उदाहरण सर्वांसमोर आहे. अदानींच्या घशात मुंबई टाकण्याचा डाव आम्ही उधळून लावणार. पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आता आली आहे. जास्तीच्या टीडीआरचा धारावीच्या टेंडरमध्ये कुठेच उल्लेख नाही. लाडका काँट्रॅक्टर, लाडका मित्र सुटबूटवाला ही योजना तुम्ही आणली आहे का ? असा जळजळीत सवाल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्य सरकारला विचारला.
उद्धव ठाकरे पुन्हा CM होणार का? ‘त्या’ चर्चांवर शरद पवारांचं एकाच वाक्यात उत्तर
उद्धव ठाकरे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्योजक गौतम अदानी, राज्य सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली. ठाकरे म्हणाले, निवडणुका जवळ यायला लागल्या आहेत. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून फसव्या घोषणा केल्या जात आहेत. त्यांना वाटतंय लोक लक्षात ठेऊन मतदान करतील. पण अनेक योजना केल्या आहेत. त्यातील एक लाकडा मित्र किंवा लाडका कॉन्ट्रॅक्टर योजनेबद्दल आज मी बोलणार आहे. धारावीवासियांचे पुनर्वसन होणार आहे पण ते त्याच ठिकाणी व्हावं अशी शिवसेनेची मागणी आहे.
धारावीत अनेक अनेक उद्योग आहेत त्यांचं काय करणार आहात. त्यांचे उद्योगही त्याच ठिकाणी सुरू होऊन धारावीकरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटला पाहिजे. अदाणीला जे टेंडर दिलं आहे त्यात जे मेन्शन केलं आहे त्यापेक्षा जास्त देण्यात येत आहे. 300 एकर जमीन गृहनिर्माणासाठी आहे. बाकीच्या भूभागावर बाकीचे उद्याने वैगेरे आहे. पण, वाढीव टीडीआर कुठेच नाही. पात्र अपात्र लोक ठरवताना धारावीतील लोकांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
झोपडपट्टी पुनर्वसनाच्या नावाखाली बाकीचे क्षेत्र लाटले जात आहे. रेल्वेची जागा देखील घेत आहेत. धारावीकरांना रेल्वेच्या ट्रांझिट कॅम्पमध्ये हलवायचा आणि बाहेर करायचा प्रयत्न आहे. टेंडर अदानीसाठी केलं आहे. सरकारने त्यांच्या मित्रासाठी केलेला हा खटाटोप आहे. पण या टेंडरमध्ये धारावीवासियांच्या पोटापाण्याचे काहीच नाही. एकूण 20 ठिकाणी धारावीच्या लोकांना हलवणार आहे. त्यामुळे बाकीच्या मुंबईवर देखील ताण येणार आहे. त्यामुळे धारावीवासियांना 500 फुटाचे घर ते आहेत तिथेच मिळाले पाहिजे. या टेंडरच्या विरोधात जर कुणी न्यायालयात गेलं तर हे टेंडर लगेचच रद्द होईल यात काहीच शंका नाही. अदानींसाठी लाडका कॉन्टॅक्टर मधून हे टेंडर काढला आहे का असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला.
‘विधानसभेत उद्धव ठाकरेंचा प्रचार करणार’ ममता बॅनर्जी मुंबईत येऊन गरजल्या
धारावीवासियांना आम्ही वाचन देतो की आम्ही त्या ठिकाणी योग्य घर धारावीकरांना देऊ. त्यांचे उद्योग देखील आम्ही त्याच ठिकाणी देऊ. आपण धारावी स्मार्ट सिटी करू शकतो. पण ते न करता धारावीवासियांना बाहेर पाठवत आहेत. ज्या ठिकाणी आतापर्यंत काही जागा राखीव होत्या त्या ठिकाणी अदानी यांना दिल्या जातात. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही हे ठिकाणी टेंडर रद्द करून नव्याने टेंडर प्रसिद्ध करू. पण आताचं जे टेंडर आहे ते का रद्द करू नये हा माझा सरकारला सवाल आहे.