“विधानसभेत उद्धव ठाकरेंचा प्रचार करणार”; ममता बॅनर्जी मुंबईत येऊन गरजल्या
Mamata Banarjee : राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहू लागले आहेत. राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यातच आज मुंबईतील राजकारणाचा मूड थोडा बदललेला दिसला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांची (Uddhav Thackeray) सदिच्छा भेट घेतली. यानंतर पत्रकार परिषदेत आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आम्ही उद्धव ठाकरेंचा प्रचार करणार आहोत, असे स्पष्ट शब्दांत सांगितले. दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे राज्यात वेगाने घडामोडी घडू लागल्या आहेत. अशातच ममता बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याने चर्चा सुरू झाल्या आहेत. याआधी ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी यांनीही काही दिवसांपूर्वी ठाकरेंची भेट घेतली होती.
उद्धव ठाकरे पुन्हा CM होणार का? ‘त्या’ चर्चांवर शरद पवारांचं एकाच वाक्यात उत्तर
विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election) आम्ही महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचा प्रचार करणार आहोत. पक्ष चिन्ह काढून घेतले तरी ठाकरे वाघासारखे लढले. मी ज्यावेळी मुंबईत येते तेव्हा नेहमीच उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना भेटते. त्यात नवीन काही नाही. ही भेट सदिच्छा भेट आहे त्यामुळे याचा राजकीय अर्थ काढू नका असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत आमचा पक्ष उद्धव ठाकरेंचा प्रचार करणार आहे, असे ममता बॅनर्जी यांनी आजच जाहीर करुन टाकले.
मोदी सरकारच्या काळात देशात आणीबाणी
यानंतर त्यांनी केंद्र सरकारच्या संविधान हत्या दिवसाच्या निर्णयावरही प्रतिक्रिया दिली. आजच्या मोदी सरकारच्या काळात देशात आणीबाणीच आहे. संविधान हत्या दिवसाचा निर्णय केंद्र सरकारने कुणालाच विचारुन घेतलेला नाही. कोणतीही चर्चा न करता सरकारने हा निर्णय घेतला. मोदींच्या कार्यकाळात देशात आणीबाणीच आहे. देशातील सरकार स्थिर नाही अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली.
वडेट्टीवारांची काम थांबवण्याची मागणी; महाजनांकडून उद्धव ठाकरेंचा उल्लेख, सभागृहात जोरदार घमासान