Download App

बाळासाहेबांनी अंगार फुलवला तिथे वैचारिक भंगार ऐकायला कोण जाणार? मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर हल्लाबोल

  • Written By: Last Updated:

Thackeray Vs Shinde : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर (Shivaji Park) होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने येथे दसरा मेळावा घेण्याचा हट्ट सोडला आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक्सवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. या मैदानावरील दावा सोडताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची संधी सोडलेली नाही.
(Uddhav Thackeray’s Dussehra gathering at Shivaji Park, Chief Minister eknath shinde dropped the claim)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा बुलंद आवाज ज्या शिवाजी पार्कवर शिवसैनिकांनी ऐकला, ज्या मैदानातून शिवसेनाप्रमुखांनी काँग्रेसला गाडण्याचा विचार मांडला. ज्या मैदानातून प्रखर हिंदुत्वाचा जागर त्यांनी केला. त्याच मैदानातून काँग्रेसला डोक्यावर घेतले जाणार असेल तर तो शिवसेनेचा दसरा मेळावा असूच शकत नाही. बाळासाहेबांच्या पवित्र विचारांनी भारावलेले शिवतीर्थ गेल्याच वर्षी या मंडळींनी बाटवले आहे. आम्ही ठरवले असते तर या मैदानावर सभा घेतलीही असती. परंतु, राज्याचा प्रमुख म्हणून मला कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणायची नव्हती.

रोहित पवार-अजितदादांमध्ये आता घमासान; दसऱ्यानंतर अजित पवारही महाराष्ट्र पिंजून काढणार !

बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्व एवढे अस्सल आहे की ते कुठेही सांगितले तरी त्यांचे तेज कमी होत नाही. त्या विचारांना शिवाजी पार्कची गरज नाही. आम्ही जाऊ तिथे त्यांचे विचार नेऊ. आपल्याला वारसा मिळाला असे म्हणणाऱ्यांनी आधी आरसा पाहावा म्हणजे खरे काय ते कळेल कोण कुठे बोलतो, यापेक्षा काय बोलतो हे महत्त्वाचे आहे. तोंड उघडले की रडगाणेच गाणार असाल तर ते कोण ऐकणार? असा टोलाही शिंदे यांनी लगावला आहे.

‘ज्यांनी संघर्ष यात्रा काढली त्यांनीच..,’; सुनिल तटकरेंनी रोहित पवारांच्या यात्रेवर ठेवलं बोट

बाळासाहेबांचा विचार त्यांनी पायदळी तुडवलाय, हे जनतेने पाहिले आहे. आम्ही बाळासाहेबांनी पेरलेले, जपलेले विचार हृदयात घेऊन पुढे निघालोय. विचारांचा वारसा आमच्याकडेच आहे. छाती बडवून रडायला शिवाजी पार्क ही जागा नाही, जिथे बाळासाहेबांना अंगार फुलवला होता तिथे आता हा वैचारिक भंगार ऐकायला कोण जाणार? असे शिंदे यांनी म्हटले आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे व ठाकरे गटामध्ये गेल्या वर्षीही याच मैदानावरून वाद सुरू झाला होता. त्यात दोन्ही गटातील नेते एकमेंकावर जोरदार टीका करत होते. दोन्ही गटात जोरदार वाकयुद्ध रंगले होते. पण गेल्याही वर्षीही ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी पार्कवर झाला. आताही तेथेच दसरा मेळावा होणार आहे.

Tags

follow us