Uddhav Thackeray : धारावी पुनर्विकास प्रकल्प (Dharavi Redevelopment Project) आणि वीज दरवाढीच्या निषेधार्थ माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 16 डिसेंबरला धारावी ते मुंबईतील अदानी समूहाच्या (Adani Group) कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे कंत्राट देऊन राज्य सरकारने व्यापाऱ्यांची बाजू घेतल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
महाराष्ट्र सरकारने जुलैमध्ये 259 हेक्टरचा धारावी पुनर्विकास प्रकल्प औपचारिकपणे अदानी ग्रुप फर्मला सुपूर्द केला आहे. धारावीतील लोकांना केवळ 350 स्क्वेअर फूट नव्हे तर सुमारे 400-500 चौरस फूट क्षेत्रफळाची जागा मिळावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
उद्धव ठाकरे म्हणाले, ‘धारावीत राहणाऱ्या लोकांना त्यांच्या उपजीविकेसाठी धारावीतच स्थलांतरित होणे आवश्यक आहे. यात बहुतांश असंघटीत कामगार आहेत. त्यांच्या उत्पादनांचे मुख्य स्त्रोत त्याच भागात आहेत. धारावीवासीयांना 400 ते 500 चौरस फूट जागा मिळावी. सुमारे 80,000 ते 90,000 झोपडपट्टीधारक पुनर्विकासानंतरही जागेसाठी अपात्र असल्याचे दिसून आले आहे. मला अदानींना विचारायचे आहे की ते याबद्दल काय करणार आहेत. सरकार उद्योगपतींना मदत करत आहे, असा आरोप त्यांनी केला.
बीआरएसला महाराष्ट्रात पहिला धक्का, भगिरथ भालके वेगळ्या वाटेवर?
उद्धव ठाकरे म्हणाले की शिवसेनेला धारावीचा पुनर्विकास हवा आहे, परंतु पुनर्विकासाचे कंत्राट देताना आणि झोपडपट्टीतील रहिवाशांचे पुनर्वसन करताना झालेल्या प्रक्रियेवर शंका आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प संशयास्पद आहे. धारावीतील गलिच्छ झोपडपट्ट्यांना सोन्याचा भाव मिळत आहे. धारावीतील छोट्या व्यापाऱ्यांनाही तिथे जागा मिळावी, अशी आमची इच्छा आहे. विकासकामांमुळे मुंबईकरांचा श्वास थांबला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
ठाकरे म्हणाले की, शून्य नियोजनामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. सरकार फक्त ठेके देत आहे. हे कंत्राट देणारे सरकार आहे. अभ्युदय नगर वांद्रेची जागाही अदानीला देण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. ते सर्व काही फक्त अदानींसाठी करत आहेत.