Download App

आंदोलनकर्त्यांनी मंत्रालयावरून उड्या; मुख्यमंत्र्यांचे थेट कलेक्टरला आदेश

  • Written By: Last Updated:

Cm Eknath Shinde : अमरावती जिल्ह्यातील काही धरणग्रस्त शेतकऱ्यांनी मंत्रालयातच आत्महत्या करण्याचा सामुदायिक प्रयत्न केल्याची घटना घडली. धरणग्रस्त कृती समिती आपल्या मागण्यासाठी आक्रमक झाले. आज मंत्रालयात या समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून आंदोलकर्त्यांनी उडी मारली. मात्र, जाळी असल्यामुळे हे धरणग्रस्त आंदोलनकर्ते थोडक्यात बचावले आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अप्पर वर्धा प्रकल्प बांधितांच्या मागण्यांबाबत पंधरा दिवसात बैठक आयोजित करून तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. तर मुख्यमंत्र्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना संपर्क साधून या संदर्भात आदेश दिले आहेत.

‘मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष’म्हणणाऱ्यांना सुप्रियाताईंचं जोरदार प्रत्त्युत्तर; म्हणाले, राष्ट्रीय अध्यक्ष..,

या बाधित गावातील जमीन, पुनर्वसनाचे पर्याय याबाबत सर्वंकष आढावा घेऊन माहिती तयार करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. या प्रकल्पामुळे अमरावती, नागपूर व वर्धा जिल्ह्यातील 42 गावे बाधित झाली आहेत. यातील बांधितांना जमिनीच्या बदल्यात जमीन, धरणग्रस्तांसाठी प्रतिक्षा यादी तयार करणे, ज्यांना नोकरी शक्य नाही, त्यांना नुकसान भरपाई अशा विविध पर्यायांबाबत चर्चा झाली आहे.


‘तेव्हा राजीनामा घेतला नसता तर भुजबळ तुरुंगात गेले असते’; शरद पवारांचा खुलासा

या प्रश्नावर ठोस तोडगा काढण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. प्रकल्पबाधितांच्या मागण्यांबाबत सर्वंकष आढावा घेण्यात यावा. त्यासाठी डेटाबेस तयार करण्यात यावा, त्यानंतर येत्या पंधरा दिवसांत याबाबत बैठक आयोजित करण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्री शिंदे यांनी माहिती एकत्र करण्याबाबत लगेचच वर्धाच्या जिल्हाधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे आदेश दिले. याबाबत प्रकल्पग्रस्तांशी जलसंपदा विभाग आणि मदत व पूनर्वसन विभागाने समन्वय साधून विविध उपाययोजना, तोडग्यांचे पर्याय तयार ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

Tags

follow us