Varsha Gaikwad : मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी महाराष्ट्र रामलीला मंडळ व साहित्य कला मंडळाच्या रामलीला कार्यक्रमावरून सरकार आणि विशेषतः शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. कारण शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी महाराष्ट्र रामलीला मंडळ व सहित्क कला मंडळाचा रावण दहन कार्यक्रम दसऱ्याच्या आदल्या दिवशी करण्यासाठी सांगितले आहे.
काय म्हणाल्या वर्षा गायकवाड?
यावेळी शिंदे गटावर टीका करताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, महाराष्ट्र रामलीला मंडळ व साहित्य कला मंडळ यांनी रित्सर्पणे आझाद मैदान पोलीस स्टेशन येथे १५ ते २४ ऑक्टोबर पर्यंतची परवानगी घेऊन रामलीला कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. रामलीलाची सुरुवात भूमिपूजन पासून रावणाचा वद होईपर्यंत त्याच ठिकाणी केली जाते. परंतु दुर्दैवाने महाराष्ट्रात असे सरकार आला आहे जे आता नवीन परंपरा सुरू करू इचेते आहेत.
“पुण्यावर तर आहेच पण कोल्हापूरवरही माझे लक्ष” : चंद्रकांतदादांचा अजितदादा अन् मुश्रीफांना इशारा
रावणाचा वध दसऱ्याला न करता आदल्या दिवशी करा किंवा त्याठिकाणी तुम्ही सालंतर व्हा. अशी नवीन परंपरा महाराष्ट्राच्या सरकारने आणली आहे. कारण त्याठिकाणी त्यांना त्यांची सभा घ्यायची आहे. महाराष्ट्रातल्या जनतेशी हा खेळ सुरू आहे. भारतातली विविध जागेवरून लोक नवरात्री दरम्यान या रामलीला कार्यक्रमाला उपस्थित असतात.
मराठा आरक्षण आंदोलन तापणार? शिंदे समितीकडून ‘दोन’ महिन्यांच्या वाढीव मुदतीची मागणी
अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही रामलीला होत असते. गेले 48 वर्षा पासून चालू असलेली परंपरेने या रामलीला कार्यक्रमाचे आयोजन होत असते. त्या रामलीला ला एक दिवस आधी बंद करण्याचं निर्णय या सरकारने घेतला आहे. त्याचा मुंबई काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात येत आहे. रामलीला ही सुरुवातीपासून ठरलेल्या तारिख पर्यंत झाली पाहिजे. कुठेही एक दिवस आधी किंवा सलंतरित असा नाही झाली.