Varsha Gaikwad firmly Delhi visit after MAV seat allocation : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने ( MAV seat allocation ) जागावाटप केलं. पण या जागावाटपानंतर काँग्रेसमध्ये धुसफूस वाढली आहे. काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड ( Varsha Gaikwad ) यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपावर स्पष्ट नाराजी व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी या नाराजीबाबत थेट दिल्ली गाठण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे ( Mallikarjun kharge ) यांची भेट घेणार आहेत.
अखेर मालदीवने गुडघे टेकले; ट्युरिझम अॅण्ड ट्रॅव्हल असोसिएशनची भारताला मदतीची साद
मात्र मल्लिकार्जुन खरगे हे उमेदवारी अर्ज भरायला गुलबर्गा या ठिकाणी गेले आहेत. त्यामुळे गायकवाड यांची आजची खरगेंची होणारी भेट लांबणीवर पडली आहे. याबाबत बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच काम आम्ही सुरु केल आहे. मात्र आमचे काही प्रश्न आहेत या संदर्भात आम्हाला दिल्लीला जायच आहे. त्यामुळे मल्लिकार्जुन खरगे यांची वेळ मिळताच आम्ही दिल्लीला जाणार आहोत.
माझं चुकलं पण खरे वारसदार असल्याचं सिद्ध करा; ‘त्या’ वक्तव्यानंतर मंडलिकांचं शाहू महाराजांना आव्हान
या अगोदर मुंबईच्या जागावाटपात मला विश्वासात घेतलं गेलं नाही अशी खंत त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली होती. यासंदर्भात त्यांनी थेट दिल्लीत तक्रार केली आहे. त्यानंतर आता त्या दिल्लीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेणार आहेत. कारण आताची निवडणूक देशासाठी खूप महत्वाची आहे. देशातील संविधान आणि लोकशाही टिकली पाहिजे आहे. त्यामुळे काळात आम्ही आणि काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता कामाल सुरुवात करणार आहे. असं देखील गायकवाड म्हणाल्या आहेत.
दुसरीकडे सांगलीमध्ये देखील नाराजी पाहायला मिळत आहे. सांगलीत काल (दि.10) विश्वजीत कदम आणि विशाल पाटलांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. यात विश्वजीत यांनी सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत (Sangli Lok Sabha Constituency) आम्ही यापूर्वीही प्रयत्न केलेत आणि इथून पुढेही करणार असल्याचे अगदी शांतपणे सांगितले. सांगलीची जागा काँग्रेसची (Congress) आहे. इथल्या कार्यकर्त्यांचीही तीच भावना आहे. त्यामुळे सांगलीबाबत पक्षश्रेष्ठींनी पुनर्विचार करावा, अशी मागणी यावेळी कदम यांनी केली.