अखेर मालदीवने गुडघे टेकले; टूरिझम अॅण्ड ट्रॅव्हल असोसिएशनची भारताला मदतीची साद
Maldives Request for help from India : भारत आणि मालदीवचा ( Maldives ) वाद अजूनही मिटलेला नाही. भारतीय पर्यटकांनी निषेध केल्यानंतर मालदीवला जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत सातत्याने घट होत चालली आहे. त्यामुळे पर्यटनावर चालणाऱ्या मालदीव देशाचा मोठं नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर मालदीवच्या टुरिझम अॅण्ड ट्रॅव्हल असोसिएशनकडून ( Tourism Association ) देशातील पर्यटनामध्ये सुधारणा करण्यासाठी भारताकडून मदतीची ( help from India ) मागणी केली आहे.
माझं चुकलं पण खरे वारसदार असल्याचं सिद्ध करा; ‘त्या’ वक्तव्यानंतर मंडलिकांचं शाहू महाराजांना आव्हान
या संदर्भात या संघटनेने भारतीय उच्चायुक्ताशी चर्चा केली आहे. ते चर्चेनंतर या संघटनेने सांगितले की, मालदीवमधील पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतातील प्रमुख शहरांमध्ये रोड-शो आयोजित केले जातील. त्याचबरोबर भारतातील प्रभावी लोकांकडून मालदीव पर्यटनाचे आवाहन केले जाणार आहे.
स्वतःच्या फायद्यासाठी मुठभर लोकांनी पवार-ठाकरेंकडे कॉंग्रेसला गहाण ठेवलं; विखेंचा थोरातांना टोला
डिसेंबर 2023 पर्यंत मालदीवमध्ये भारतीय पर्यटकांची संख्या सर्वाधिक होती. मात्र मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली. त्यानंतर भारतीय नागरिक चिडले. त्यांनी मालदीवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली. त्यामुळे आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे पर्यटकांच्या संख्येच्या बाबतीत भारत सहाव्या क्रमांकावर आला आहे.
त्यानंतर मालदीवमध्ये येणारे सर्वाधिक पर्यटक चीन, रशिया, ब्रिटन, इटली आणि जर्मनीचे आहेत. भारतीयांनी बहिष्कार टाकल्यानंतर चिनी पर्यटकांची संख्या वाढली होती. पण आता चिनी पर्यटकही रोडावले आहेत. फेब्रुवारी महिन्यात 33 हजार 897 चिनी पर्यटक मालदीवला आले होते. तर मार्च महिन्यात ही संख्या निम्म्यापेक्षाही कमी होऊन फक्त 13 हजार 609 वर आली आहे.