स्वतःच्या फायद्यासाठी मुठभर लोकांनी पवार-ठाकरेंकडे कॉंग्रेसला गहाण ठेवलं; विखेंचा थोरातांना टोला

स्वतःच्या फायद्यासाठी मुठभर लोकांनी पवार-ठाकरेंकडे कॉंग्रेसला गहाण ठेवलं; विखेंचा थोरातांना टोला

Radhakrishan Vikhe Patil Criticize Balasaheb Thorat : मुठभर लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी क्रॉंग्रेस पक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे गहाण ठेवला आहे. असे गंभीर आरोप ( Criticize) राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishan Vikhe Patil ) यांनी केला. कॉंग्रेसमधील काही नेते स्वतःचे नेतेपद टिकवण्यासाठी काम करत असून त्यांना पक्षाचे काही घेणेदेणे राहिले नसल्याची टीकाही त्यांनी केली.

विदर्भ, मराठवाड्यात भर उन्हाळ्यात आस्मानी संकट; गारपीट अन् अवकाळीने पीकांचं मोठं नुकसान

बुथ सक्षमिकरण अभियानाच्या निमिताने तालुक्यातील आश्वी बुद्रुक, उमरी बाळापूर येथे मंत्री विखे पाटील यांनी बुथ प्रमुख तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी संवाद साधला. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. ज्या ठिकाणी पक्षाचे प्राबल्य आहे. अशा जागा सोडून द्यायचा स्वत:च्या फायद्यासाठी नको तिथे उमेदवार देण्याचे काम राज्यातील कॉंग्रेसी नेत्यांनी केले असं विखे म्हणाले आहेत.

Horoscope Today : ‘वृश्चिक’ राशीच्या व्यक्तींना मिळेल नशिबाची साथ; पाकीट जरा जपून वापरा!

तर बाळासाहेब थोरात स्वतः ला जेष्ठ नेते समजतात पण थोरातांची आता किव येते कारण त्यांना स्वतःच्या जिल्ह्यात एकही जागा मिळवता आली नाही. उत्तर महाराष्ट्रात ८ जागा असताना तिथे ही कॉंग्रेसला एकही जागा मिळाली नाही. यामुळे थोरातांनी काय काम केले? असा सवाल विखे पाटील यांनी केला.

नगर जिल्ह्यात कॉंग्रेसला का जागा मिळाली नाही? याची कारणे लोकांना आणि कार्यकर्त्यांना थोरातांनी सांगितली पाहिजेत. असं थेट आव्हान देवून, सांगलीच्या जागेसाठी आग्रही असणाऱ्या थोरातांनी स्वतःच्या नगर जिल्ह्यात पक्षाचे काय चालले आहे? याकडे लक्ष द्यावे असा सल्ला सुद्धा त्यांनी यावेळी थोरातांना दिला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज