विदर्भ, मराठवाड्यात भर उन्हाळ्यात आस्मानी संकट; गारपीट अन् अवकाळीने पीकांचं मोठं नुकसान

विदर्भ, मराठवाड्यात भर उन्हाळ्यात आस्मानी संकट;  गारपीट अन् अवकाळीने पीकांचं मोठं नुकसान

Maharashtra Weather Update Unseasonal rain loss of crops : राज्यात सध्या संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे. शहरांच्या कमाल तापमानात घट होत असतानाच, काही ठिकाणी अवकाळी पावसाचं ( Unseasonal rain ) सकट कायम आहे. त्यामध्ये हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार ( Maharashtra Weather Update ) राज्यामध्ये संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी आणि गारपिटीमुळे हजारो हेक्टरवरील पिकांचे मोठं नुकसान ( loss of crops ) झाले आहे.

Horoscope Today : ‘वृश्चिक’ राशीच्या व्यक्तींना मिळेल नशिबाची साथ; पाकीट जरा जपून वापरा!

या पावसाचा मुक्काम आणखी दोन दिवस वाढणार असल्याचे देखील हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात शेतकऱ्यांना काही ठिकाणी पाणीटंचाई तर काही ठिकाणी अस्मानी संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आधिच पाण्याअभावी कसेबसे वाचलेले पीकांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला आहे.

‘वंचित’ची पाचवी यादी; दहा उमेदवारांची नावे जाहीर, कोणाला मिळाली संधी?

यामध्ये विदर्भामधील नागपूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह गारपिटीने थैमान घातलं आहे. याच दरम्यान मराठवाड्यातील जालन्यासह काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा फटका बसला आहे. त्यात द्राक्षबाग आणि मोसंबी या फळबागांचे मोठे नुकसान झालं आहे.

IMD सांगितले की, राज्यात बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे येत आहेत. या वाऱ्याचा परिणाम म्हणून विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे विदर्भात एकीकडे विदर्भात अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. तर काही ठिकाणी तापमानात वाढ होऊन पारा ४० अंशांवर पोहोचण्याची शक्यता आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज