‘वंचित’ची पाचवी यादी; दहा उमेदवारांची नावे जाहीर, कोणाला मिळाली संधी?

‘वंचित’ची पाचवी यादी; दहा उमेदवारांची नावे जाहीर, कोणाला मिळाली संधी?

Vanchit Candiate List : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) वंचित बहुजन आघाडीच्यावतीने उमेदवारांची (Vanchi Candiate List) पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये एकूण 10 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. वंचिकडून मुंबईतील तीन लोकसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर करण्यात आले असून मुंबई उत्तरसाठी बीना सिंह तर मुंबई उत्तर पश्चिममधून संजीवकुमार कलकोरी आणइ दक्षिण मध्य मुंबईतून अब्दुल खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

वंचितकडून रायगड लोकसभेच्या जागेसाठी कुमूदानी चव्हाण यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर धाराशिवमधून भाऊसाहेब अंधाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नंदुरबारमधून हनुमंत कुमार सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर जळगाव लोकसभा मतदारसंघातून प्रफुलकुमार लोढा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून गुलाब बर्डे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. पालघरमधून विजय म्हात्रे तर भिवंडीमधून निलेश सांबरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

मोठी बातमी! माढ्यात रणजितसिंह निंबाळकरांविरुद्ध धैर्यशील मोहितेंची लढत? पवारांकडून पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब

महाविकास आघाडीत स्थान न मिळालेल्या वंचित बहुजन आघाडीने लोकसभेसाठी आता स्वतंत्रपणे आपले उमेदवार रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. वंचित बहुजन आघाडीने आधी अकरा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनीही उमेदवारी यादी जाहीर केली. काही दिवसांपूर्वी आठ जागांवर उमेदवार दिले होतो. तर आज वंचिकडून 10 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

दरम्यान, आतापर्यंत वंचितने 29 जागांवर उमेदवार जाहीर केले आहे. दुसऱ्या यादीत सोलापूर, माढा, सातारा या महत्त्वाच्या जागांवर वंचितने उमेदवार दिले आहेत. तर आज जाहीर करण्यात आलेल्या यादीत रायगड, मुंबई, धाराशिव, जळगाव, नंदूरबार, दिंडोरी, पालघरमध्ये उमेदवार देण्यात आले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज