India Maldives Conflict : मालदीवचा हट्टीपणा नडला! उपचाराअभावी 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू
India Maldives Conflict : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यावर मालदीवच्या मंत्र्यांनी टीका केल्यापासून (India Maldives Conflict) दोन्ही देशांतील संबंध बिघडले आहेत. त्यावरून मोठा वादही सुरू झाला आहे. आता या वादाला आणखी तडा देणारी घटना घडली. मालदीवचे राष्ट्राध्यशक्ष मुइज्जू यांच्या हट्टीपणामुळे एका चौदा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. मुइज्जू यांनी एअरलिफ्टसाठी भारताने दिलेले डॉर्नियर विमान वापरण्याची परवानगी नाकारल्यानंतर शनिवारी मालदीवमध्ये एका मुलाचा मृत्यू झाला. या मुलाला ब्रेन ट्यूमर होता. त्यातच त्याला पक्षाघाताचा झटका आला. अशा परिस्थितीत त्याच्यावर तत्काळ उपचार होणे गरजेचे होते. दवाखान्यात नेण्यासाठी मुलाच्या कुटुंबियांनी एअर अॅम्ब्यूलन्ससाठी विनंतीही केली होती. परंतु, पुढे यंत्रणा हलली नाही.
India Maldives : दणका बसलाच! मालदीवला रोज 9 कोटींचं नुकसान; भारतीयांसाठी घेतला ‘खास’ निर्णय
मुलाची प्रकृती अचानक बिघडल्याने त्याला गाफ अलिफ विलिंगली येथील त्याच्या घरातून राजधानी माले येथे नेण्यासाठी एअर अॅम्ब्यूलन्सची आवश्यकता होती. यासाठी विनंतीही करण्यात आली. अधिकाऱ्यांनी तत्काळ स्थलांतरासाठी अर्जही केला होता. मालदीवच्या मीडियाने मुलाच्या वडिलांच्या हवाल्याने सांगितले की, पक्षाघातच्या झटक्यानंतर मुलाला माले येथे नेण्यासाठी आयलँड एव्हिएशनला फोन केला होता. परंतु, काही उत्तर मिळाले नाही.
अशा आपत्कालीन प्रसंगात एअर अॅम्ब्यूलन्सची सर्वाधिक गरज असते. परंतु, गुरुवारी उत्तर मिळाले. तोपर्यंत उशीर झाला होता. तब्बल 16 तासांनी मुलाला माले येथे आणण्यात आले. यानंतर आसंधा कंपनी लिमिटेडने निवेदनात स्पष्ट केले, की विनंती आल्यानंतर तत्काळ प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. परंतु, उड्डाणातील तांत्रिक समस्येमुळे शेवटच्या क्षणी वळवणे शक्य झाले नाही.
मालदीवची ट्रीप कॅन्सल करा अन् ‘छोले भटूरे’ची ट्रीट घ्या; उत्तर प्रदेशच्या हॉटेल व्यवसायिकाची ऑफर
वैद्यकिय आणीबाणीच्या या प्रसंगात भारतीय हेलिकॉप्टर किंवा विमानाच्या मदतीने एअरलिफ्ट करण्याची गरज होती. त्यासाठी मालदीव सरकारन परवानगी दिली नाही. परिणामी उपचारास उशीर झाला आणि त्या मुलाचा मृत्यू झाला. तत्काळ एअरलिफ्टची व्यवस्था करण्यात अधिकारी अपयशी ठरल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केल आहे. सरकारच्या या निर्णयावर विरोधी नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. लोकांनी राष्ट्रपतींच्या भारताप्रती असलेले वैर पूर्ण करण्यासाठी प्राण देऊन किंमत चुकवू नये, असे येथील खासदार मिकेल नसीम यांनी सांगितले.