Download App

टायगर अभी जिंदा है… जयंत पाटील समर्थकांकडून व्हिडीओ व्हायरल

मुंबई : नागपूर अधिवेशनातून निलंबीत केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) विधिमंडाळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Assembly Budget Session) परतले आहेत. याच निमित्ताने शिंदे-फडणवीस सरकारला डिवचवणारा व्हिडीओ जयंत पाटील समर्थकांकडून व्हायरल करण्यात आला आहे. ‘टायगर अभी जिंदा है…’ असे कॅप्शन देण्यात आले आहे.

अध्यक्षांबाबत अपशब्द वापरल्याने हिवाळी अधिवेशनातून जयंत पाटील यांचं निलंबन करण्यात आलं होतं. त्यावेळी विरोधापक्षनेते अजित पवार यांनी झाल्या प्रकारावर दिलगिरी व्यक्त केली होती. पण शिंदे-फडणवीस सरकारने निलंबनाचा ठराव मांडत जयंत पाटील यांचं निलंबन केलं होतं. या कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि समर्थक आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत या कारवाईचा निषेध केला होता. यावेळी आमदारांनी जयंत पाटील यांना खांद्यावर उचलत त्यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या होत्या.

शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना तो आग्रह केला नसता तर….

जयंत पाटील हे मुरब्बी राजकारणी म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांनी ‘करेक्ट कार्यक्रम’हा शब्द राजकीय पटलावर परिचित केला आहे. विधानसभेतील त्यांचे भाषण अभ्यासपूर्ण आणि विनोदी शैलीत असते. मात्र नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात बोलताना त्यांच्याकडून अध्यक्षांबाबत अपशब्द गेला आणि सत्ताधारी आमदारांनी त्याचं गोष्टीचं भांडवल करीत त्यांच निलंबन करण्याचा आग्रह धरला. हिवाळी अधिवेशनात जयंत पाटील यांच्या निलंबनामुळे विरोधीपक्ष बॅकफूटवर गेला होता. पण मुंबईच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जयंत पाटील परतले आहेत आणि आता कोणाचा ‘करेक्ट कार्यक्रम’करतात हे पाहावं लागलं.

Tags

follow us