शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना तो आग्रह केला नसता तर….

  • Written By: Published:
शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना तो आग्रह केला नसता तर….

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधून (Maha Vikas Aghadi Govt) बाहेर पडत एकनाथ शिंदेंनी ठाकरे सरकार पाडलं. शिवसेनेचे ४० आणि छोटे पक्ष, अपक्षांना धरून एकूण ५० आमदारांच्या मदतीनं शिंदेंनी भाजपसोबत जाऊन नवं शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे यांनी आपल्याच नेतृत्वाविरोधात बंड केलं होतं. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं गेलं. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानल्या गेला. त्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. दरम्यान, आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नाराजीविषयी विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी (Ajit Pawar) भाष्य केलं.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अजित पवारांनी 2019 च्या वेळचा सरकार स्थापनेचा किस्सा सांगितला. ते म्हणाले, तीन पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याचा निर्णय जेव्हा झाला, सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतला. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी या आघाडीचं प्रमुख व्हावं पाहिजे, असा आग्रह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठांनी केला. उद्धव ठाकरे प्रमुख असल्याने त्यांना कोणाला विचारण्याची गरज नव्हती. तो आग्रह झाला नसता तर उद्धव ठाकरेंनी कदाचित एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री केलं असतं. कारण जेव्हा गटनेता कोणाला करायचं, प्रमुख म्हणून कामकाज कोण पाहणार असा प्रश्न निर्माण व्हायचा तेव्हा एकनाथ शिंदेंकडेच जबाबदारी दिली जायची, असं अजित पवारांनी सांगितलं.

Ajit Pawar यांनी ‘त्या’ अजब आदेशावरुन शिंदे-फडणवीस सरकारला सुनावले

मात्र, सत्तास्थापनेच्या वेळी शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याचा आग्रह केला. त्यामुळे ते सीएमच्या खुर्चीत बसले आणि राज्यात मविआ सरकार स्थापन झालं. मात्र, नंतरच्या काळात त्यांच्याच पक्षातील अनेक नेते नाराज झाले. कारण काय तर त्यांना सीएमपद हवं होतं. खरंतर शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना सीएमपदाच्या खुर्चीत बसण्याचा आग्रह केला नसता तर 2019 मध्येच उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेना सीएम केलं असंत, असा दावा अजित पवारांनी केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube