Download App

‘वरळीतून मला उमेदवारी द्या…’; अभिनेता सुशांत शेलार शिंदे गटाकडून आदित्य ठाकरेंविरोधात लढणार?

सुशांत शेलारने आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) विरोधात निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली. सुशांतने वरळी विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकला.

  • Written By: Last Updated:

Sushant Shelar : काहीच दिवसांपूर्वी अभिनेते सयाजी शिंदे यांनी अजित पवार (Ajit Pawar) गटात प्रवेश केला. तर आता अभिनेता सुशांत शेलार (Sushant Shelar) हा देखील निवडणुकीच्या आखाड्यात (Vidhansabha Election) उतरण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे सुशांतने ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) विरोधात निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली. एका वृत्त वाहिनाशी बोलतांना सुशांतने वरळी विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकला.

Uddhav Thackeray : विधानसभेसाठी ठाकरेही तयार, ‘या’ उमेदवारांना थेट एबी फॉर्मचं वाटप 

महाराष्ट्र विधानसभेचा रणसंग्राम जवळ आला. अवघ्या २७ दिवसांवर निवडणुका येऊन ठेपली. आता सुशांत शेलारने वरळी मतदारंसघावर दावा ठोकला. याबाबत बोलतांना सुशांत शेलार म्हणाला, मी वरळीचा एक सामान्य नागरिक आहे.  मी कमला मिलमध्ये काम करणाऱ्या एका सामान्य कामगाराचा नातू आहे. टेलिकॉम कंपनीत काम करणाऱ्या एका सामान्य कामगाराचा मी मुलगा आहे. चाळीतल्या घरात लहानाचा मोठा होत मी माझ्या अभिनयाचा प्रवास सुरू केला. तसाच बाल शिवसैनिक म्हणूनही माझा प्रवास सुरू झाला. त्यामुळे जनतेच्या मूलभूत प्रश्नांची मला जाण आहे. इथल्या आमदारांनी पाच वर्षात मुलभूत प्रश्न सोडवले नाहीत. त्यामुळे निवडणूक लढवायची असल्याचं त्याने स्पष्ट केलं.

ठाकरेंचे आणखी एक युवराज आखाड्यात… माहीममध्ये बिग फाईट

2019 मध्ये आदित्य ठाकरेंनी पहिल्यांदा निवडणूक लढवली होती आणि ते विजयी देखील झाले होते. ते वरळी विधानसभेचे नेतृत्व करत आहेत. मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर इतरांप्रमाणे सुशांतनेही शिंदे गटाला साथ दिली. त्यामुळे आता वरळी विधानसभा मतदारसंघावरही सुशांत शेलारने दावा केला आहे.  विधानसभा निवडणुकीची पहिली यादी शिंदे गटाने जाहीर केली आहे. वरळी विधानसभेसाठी अद्याप उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे शिंदे गट सुशांतलाही वरळीतून संधी देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांच्या पक्षाने वरळी मतदारसंघातून संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली आहे. संदीप देशपांडे हे मनसेचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. आता शिंदे गटाकडून सुशांतला उमेदवारी दिल्यास वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे, संदीप देशपांडे आणि सुशांत शेलार यांच्यात तिहेरी लढत होणार आहे.

 

follow us