मुंबई : खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राष्ट्रवादीत कोणतीही फूट पडलेली नसल्याचे विधान केल्यानंतर आज (दि. 25) अजित पवार (Ajit Pawar) आमचेच नेते असल्याचे विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले आहे. त्यांचे हे विधान म्हणजे नवी गुगली असल्याचे मत काहींनी व्यक्त केले असून, पवारांच्या या मोठ्या विधानानंतरही आमचा पवारांवर पूर्ण विश्वास असल्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. (Vijay Waddettiwar Reaction On Sharad Pawar Statement)
शरद पवार हे मोठे नेते आहेत, कोर्टात केस सुरू होईल म्हणून त्यांच्या स्ट्रॅटजीचा तो भाग असू शकतो असेही वडेट्टीवर म्हणाले. ते म्हणाले की, काँग्रेसनं शरद पवार यांच्या वक्तव्याचा अर्थ काढावा, यापेक्षा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना या विधानाचा अर्थ विचारा असे म्हणत शरद पवार महाविकास आघाडीसोबतच आहेत, असा ठाम विश्वास वडेट्टीवारांनी यावेळी व्यक्त केला.
Maharashtra Politics : शरद पवार अन् अजितदादा एकत्र येणार का? भुजबळांच्या उत्तराने सस्पेन्स वाढला
राज्यातील राजकारण पूर्णपणे अस्थिर झाले असून, भाजपच्या नेत्यांनी संपूर्ण राजकारण नासवण्याचे काम केले आहे. त्यामुळे शब्दांवर आणि आश्वासनांवर विश्वास कुणीच ठेऊ शकत नाही. ज्यांनी जनतेचा विश्वासघात केला, त्यांना जनता जागा दाखवेल असे म्हणत येत्या निवडणुकीत सर्व चित्र स्पष्ट होईल. प्रत्येक पक्ष काम करताना अनेकदा शेवटच्या क्षणी फूट पडते, त्यावर ते आपला प्लॅन बी ठेवतात, कोण कुठे जातं हे निवडणुकीत स्पष्ट होईल.
‘तुम्ही अक्कल तरी वापरा’; बावनकुळेंशी संबंधित ‘त्या’ प्रश्नावर शरद पवार संतापले
आम्हाला धोका वाटण्याचं कारण नाही
पवारांच्या या विधानानंतर आता मविआमध्ये खळबळ माजल्याचे चित्र दिसू लागले आहे का असा प्रश्न विचारल्यावर वडेट्टीवार म्हणाले की, पवारांच्या आजच्या विधानामुळे आम्हाला धोका वाटण्याचं कारण नसून, निवडणुकीच्या तारखेपर्यंत जे ठरेल त्यानुसार परिस्थिती दिसेल. निवडणुकीतच चित्र स्पष्ट होईल असे सांगत INDIA च्या पाठीमागे जनता असेल असे म्हणत भाजप सरकारची लोकप्रियता संपली आहे.