Maharashtra Politics : शरद पवार अन् अजितदादा एकत्र येणार का? भुजबळांच्या उत्तराने सस्पेन्स वाढला

Maharashtra Politics : शरद पवार अन् अजितदादा एकत्र येणार का? भुजबळांच्या उत्तराने सस्पेन्स वाढला

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात  (Maharashtra Politics) शिवसेनेत फूट पडल्यानंतर बरोबर एक वर्षांनंतर राष्ट्रवादीही (NCP Crisis) फुटली. अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे यांच्यासह काही आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकारमध्ये सहभागी झाले. यानंतर आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांकडून एकमेकांवर टीका होत आहे. तसेच अजित पवार गट पुन्हा स्वगृही येणार का, शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार का, असाही प्रश्न दबक्या आवाजात विचारला जात आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी वक्तव्य केले होते.

राष्ट्रवादीत फूट नाही. अजित पवार हेच (Maharashtra Politics) आमच्या पक्षाचे नेते आहेत. त्यांच्या उत्तराची वाट आम्ही पाह आहोत, असे त्यांनी काल पुण्यातील पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यावर आता अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया ताईंचे वडील आहेत आणि दुसरा भाऊ आहे. त्यामुळे सुप्रिया ताईंनाच जर माहिती नसेल तर ते एकत्र येणार की नाही मग मला कसं माहित असणार, असा टोला भुजबळ यांनी लगावला.

अजितदादा परत येतील का? सुप्रिया सुळेंनी एकाच वाक्यात दिलं उत्तर

काय म्हणाल्या होत्या सुळे ?

आमचा पक्ष एकच आहे. पक्ष फुटलेला नाही. एक गट सत्तेत आहे, तर एक गट विरोधी पक्षात आहे. अजित पवार आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या उत्तराची आम्ही वाट पाहात आहोत. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात पुण्यात भेट झाली. उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या घरी ही बैठक झाली. ही गुप्त भेट असल्याचे बोललं गेलं. त्यावर आम्ही गुप्त बैठक करत नाही. चोरडिया यांच्या घरी गुप्त बैठक का होईल? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.

दरम्यान, अजित पवार पुन्हा येतील का, असाही प्रश्न त्यांना एका इंग्रजी वृत्तपत्राच्या मुलाखतीदरम्यान विचारण्यात आला होता. अजितदादांनी लोकशाहीत एक नागरिक म्हणून त्यांचा निर्णय घेतलेला आहे. अजितदादा परत येतील की नाही हे आपण सांगू शकत नाही. पवार कुटूंब एकत्र ठेवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करु. कुटुंबामध्ये राजकारण येणार नाही, याची काळजी घेऊ असे उत्तर सुळे यांनी दिले होते. 

अजितदादा परत येतील का? सुप्रिया सुळेंनी एकाच वाक्यात दिलं उत्तर

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube