अजितदादा परत येतील का? सुप्रिया सुळेंनी एकाच वाक्यात दिलं उत्तर
Supriya Sule on NCP Crisis : शिवसेनेत फूट पडल्यानंतर बरोबर एक वर्षांनंतर राष्ट्रवादीही (NCP Crisis) फुटली. अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे यांच्यासह काही आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकारमध्ये सहभागी झाले. यानंतर आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांकडून एकमेकांवर टीका होत आहे. तसेच अजित पवार गट पुन्हा स्वगृही येणार का, असाही प्रश्न दबक्या आवाजात विचारला जात आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाष्य केले आहे.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी विविध मुद्द्यांवर मते व्यक्त केली. त्या म्हणाल्या, अजित पवार गटाशी वैचारिक संघर्ष आहे. मात्र, कुटुंब म्हणून आम्ही एकत्रच आहोत. अजित पवार यांच्यामुळे पक्षात फूट नाही. माझ्यासाठी खूप दुर्दैवी आणि निराशाजनक आहे. आता हा विचारधारेचा संघर्ष आहे. मी माझी निवडणूक भाजपविरोधात लढले. मात्र जेव्हा आमच्या पक्षातीलच काही लोक असा निर्णय घेतात आणि पक्ष विस्कळीत होतो हे दुर्दैवीच आहे.
आघाडी सरकार असतानाही शिवसेना-राष्ट्रवादीत धुसफूस; पटेलांनी केला धक्कादायक खुलासा
अजित पवार यांना परतीचे मार्ग खुले आहेत का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सुळे म्हणाल्या, हे सर्व निराशाजनक आहे. मात्र संवाद म्हणजे त्यांना परत येण्याची परवानगी आहे असे नाही. ते परत येईल की नाही यावर मी काहीच भाष्य करू शकत नाही. मात्र, आमच्याकडून कुटुंब अबाधित ठेवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येतील. कुटुंबात राजकारण येणार नाही यासाठीही आम्ही प्रयत्न करू. लोकशाहीने दिलेल्या अधिकारात त्यांनी निर्णय घेतला आहे. त्यामुळे आमच्यात राजकीय संघर्ष का व्हावा. ही खरेतर वैचारिक लढाई आहे. आम्ही कुटुंब म्हणून एकत्र राहू पण, वैचारिकदृष्ट्या एकमेकांविरुद्ध लढणार आहोत, असा इशाराही सुळे यांनी दिला.
आघाडी सरकारमध्ये शिवसेनेबरोबर धोरण नव्हते-पटेल
आम्ही शिवसेनेसोबत जाऊन सत्ता मिळवली तेव्हा त्यांच्यासोबत आमचे ध्येयधोरण सुसंगत नव्हते. त्यामुळे आम्हाला पुन्हा सत्तेत यावे लागले. शरद पवार (Sharad Pawar) साहेब आमचे दैवत असून पवार साहेबांना मानणारा मी माणूस आहे. त्यांना आजही नव्हे तर उद्यासुद्धा मानेन. माझ्या सर्व कार्यकर्त्यांना पवार साहेबांबद्दल कुणी काही सांगतिलं तरी ऐकायचं नाही अशा सूचना दिल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी बुधवारी भंडाऱ्यात दिल्या.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर नवी जबाबदारी, निवडणुक आयोगाचा नॅशनल आयकॉन म्हणून नियुक्त