आघाडी सरकार असतानाही शिवसेना-राष्ट्रवादीत धुसफूस; पटेलांनी केला धक्कादायक खुलासा

आघाडी सरकार असतानाही शिवसेना-राष्ट्रवादीत धुसफूस; पटेलांनी केला धक्कादायक खुलासा

Prafulla Patel on NCP Crisis : शिवसेनेत फूट पडल्यानंतर बरोबर एक वर्षांनंतर राष्ट्रवादीही (NCP Crisis) फुटली. अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे यांच्यासह काही आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकारमध्ये सहभागी झाले. यानंतर आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात आरोप प्रत्यारोप सुरू असून या गटातील नेते मागील काळात पडद्यामागे काय घटना घडल्या याचा खुलासा करू लागले आहेत. या धक्कादायक खुलाशांनी राजकारणात रोज नवनवे स्फोट घडत आहेत.

आताही राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल (Prafulla Patel) यांनी असाच एक धक्कादायक खुलासा केला आहे. पटेल बुधवारी भंडारा येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आम्ही अडीच वर्षे सत्तेत होतो. मात्र, खऱ्या अर्थाने सत्ता आमच्याकडे नव्हती. आम्ही शिवसेनेसोबत जाऊन सत्ता मिळवली तेव्हा त्यांच्यासोबत आमचे ध्येयधोरण सुसंगत नव्हते. त्यामुळे आम्हाला पुन्हा सत्तेत यावे लागले.

आमदार अपात्र प्रकरण; विधानसभा अध्यक्षांकडे शिवसेनेच्या आमदारांचं लेखी उत्तर सादर…

शरद पवार (Sharad Pawar) साहेब आमचे दैवत असून पवार साहेबांना मानणारा मी माणूस आहे. त्यांना आजही नव्हे तर उद्यासुद्धा मानेन. माझ्या सर्व कार्यकर्त्यांना पवार साहेबांबद्दल कुणी काही सांगतिलं तरी ऐकायचं नाही अशा सूचना दिल्याचे पटेल म्हणाले.

भंडाऱ्यात रोहित पवारांंचे स्वागतच

रोहित पवार यांच्यावरही पटेल यांनी भाष्य केले. आमदार पवार भंडारा-गोंदियात आले तर त्यांचे स्वागतच करू. येथे त्यांचे मनापासून स्वागत आहे त्यांनी माझ्या घरी यावं. जेवण करावं पण, राजकारण त्यांच्या बाजूने करावं. त्यांनी माझ्याविरोधात भाषण केलं तरी मला चालेल, असेही पटेल म्हणाले.

आगामी निवडणुका एनडीएचा घटक पक्ष म्हणून लढण्याची पूर्ण तयारी आम्ही केली आहे. त्यासाठी योग्य पद्धतीने नियोजन करून ज्या मतदारसंघात ताकद असेल तेथे उमेदवार देऊ. यासाठी एनडीएतील अन्य घटक पक्षांशी चर्चा करूनच निर्णय घेणार असल्याचे पटेल यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube