मुंबईः ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस नामक व्यक्तीने पाच राऊंड फायर करत गोळीबार केला आहे. या घटनेमध्ये अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला आहे.घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या मॉरिसने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केलीय. हा सर्व प्रकार मॉरिसने आपल्या फेसबुक लाइव्हवर केला आहे. या गोळीबाराचा थरारा पाहुण अनेकांना धक्का बसला आहे.
ओमराजेंच्या विरोधात माजी IAS अधिकारी? भाजपच्या डोक्यात लातूर भुकंपातील ‘हिरोचे’ नाव
नेमकं काय घडलं?
अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस हे पूर्वीपासून एकमेकांना ओळखत होते. दोघांमध्ये एक वर्षांपूर्वी वादही झाला होता. दोघांमध्ये वैयक्तिक स्वरुपाचे वादही होते. दोघांमधील वाद मिटल्यानंतर आज दोघेही मॉरिसच्या ऑफिसमध्ये एकत्र आले होते. मॉरिसने स्वतःच्या कार्यालयात त्याने अभिषेक घोसाळकर यांना बोलावलं आणि फेसबुक लाईव्हही केलं. त्यावेळी या दोघांनीही एकमेकांबद्दल कौतुकाचं शब्द वापरल्याचं दिसून येतं आहे.
डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीमध्ये ‘या’ पदांसाठी भरती, महिन्याला 42 हजार रुपये पगार
दोघांमध्ये बोलणं झाल्यानंतर अचानक मॉरिसने घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. मॉरिसने एकूण 5 राऊंड फायर केले या 5 राऊंडपैकी तीन गोळ्या घोसाळकरांना लागल्या आहेत. एक गोळी अभिषेक घोसाळकरांच्या डोक्यात लागली तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. तर इकडे मॉरिस यानेही स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. मॉरिस आणि घोसाळकर यांच्यात पैशांचा व्यवहार झाला होता, त्याच व्यवहारातून ही घटना घडल्याचे समोर येत आहे. याबाबत सविस्तर पोलिस तपास सुरू आहे. त्यामुळे या भागात तणाव निर्माण झाला आहे.
Jitendra Awhad : ‘त्यांच्या नादाला लागले अन् अजित पवार’.. आव्हाडांचे धनंजय मुंडेंना तिखट प्रत्युत्तर
मॉरिस नावाचा इसम दहिसर- बोरिवली परिसरात स्वयंसेवी संघटना चालवत असल्याची माहिती आहे. स्थानिक राजकीय वर्तृळात मॉरिस नावाच्या व्यक्तीला स्वयंघोषित नेता म्हणून ओळखले जायचे.
फेसबुकमध्ये लाईव्हमध्ये अभिषेक घोसळकर काय म्हणाले?
लाईव्ह येण्याची आज संधी मिळाली आहे. आम्हा दोघांनाही एकत्र लाईव्ह पाहुन अनेकांना आश्चर्यं वाटेल. पण आम्ही आता एकत्र आलो आहोत तर चांगलं व्हिजन घेऊन काम करण्यासाठी एकत्र आलो आहोत. नवीन वर्षांत चांगलं काम करुन लोकांना सोबत घेऊन, लोकांचा फायदा पाहुन काम करणार आहोत. आत्ता आम्ही 300 महिलांना साडी आणि अन्नदान करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही महिलांना साडी आणि अन्नधान्याचे वाटप करणार आहोत. तसेच येत्या 10 तारखेला मुंबई ते नाशिक आणि नाशिक ते मुंबई बसेस पाठवणार आहोत, त्याचीही तयारी सुरु आहे. आता एकत्र आलोयं तर चांगल काम करणार आहोत. मुंबईतील बोरिवली, गणपत पाटील नगर परिसरातील लोकांना सेवा करुन दाखवणार आहोत हा संकल्प आम्ही दोघेही करत असल्याचं अभिषेक घोसाळकर लाईव्हमध्ये बोलत होते.