Download App

Vishal Gawali Suicide : विशालने आत्महत्या केलेली नाही, तर त्याची हत्या; वकिलाच्या दाव्याने एकच खळबळ

Vishal Gawali Suicide : विशाल गवळीने आत्महत्या केलेली नाही. तर त्याची हत्या करण्यात आली, असं त्याच्या वकिलांनी म्हटलंय.

  • Written By: Last Updated:

Vishal Gawali Suicide : काही दिवसापूर्वी कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्या प्रकरणी तुरुंगात असलेल्या विशाल गवळीने (Vishal Gawali ) आज आत्महत्या केली आहे. तळोजा तुरुंगात (Taloja jail) असताना त्याने हे टोकाचं पाऊल उचललं. दरम्यान, आता या आत्महत्या प्रकरणाला आता वेगळंचं वळण लागण्याची शक्यता आहे. विशाल गवळीने आत्महत्या केलेली नाही. तर त्याची हत्या करण्यात आली, असं त्याच्या वकिलांनी म्हटलंय.

Pune Crime: पुणे हादरले! प्रियकराच्या मदतीने आईनेच लेकीचे अश्लील व्हिडिओ काढून केले व्हायरल 

तसेच तळोजा तुरुंगात त्याला त्याच्या वकिलांना किंवा कुटुंबातील सदस्यांना भेटू दिले जात नव्हते, असा आरोप त्याचे वकील संजय धनके यांनी केला.

विशाल गवळीचे वकील संजय धनके यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप केलाय. विशाल गवळीने आत्महत्या केलेली नाही. तर त्याला मारलं गेलं आहे. तळोजा तुरुंगात वकील आणि कुटुंबातील सदस्यांना त्याला भेटू दिले गेले नाही. या घटनेची चौकशी झालीच पाहिजे. तो गेल्या तीन महिन्यांपासून या कारागृहात आहे. आम्ही त्याला तीन-चार वेळा भेटलो. त्याने कधीही आम्हाला मी तणावात आहे, असं सांगितलं नाही. तपासात मी निर्दोष सुटेल. याचा मला विश्वास आहे, असंच तो सांगत होता, असा दावा धनके यांनी केला.

बाबासाहेबांचे विचार सर्वदुर पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा;अजितदादांकडून डॉ. आंबेडकरांना अभिवादन 

न्यायालयाने फाशी आणि जन्मठेप दिली असती तरी चाललं असते, मात्र, या लोकांना हत्या करण्याचा अधिकार आहे का? पोलिसांना आता न्यायालयाची भीती राहिलेली नाही, असं मतही धनके यांनी व्यक्त केले.

माझा मुलगा कधीही आत्महत्या करणार नाही…
दरम्यान, विशालची हत्या झाली आहे. त्याच्या फसवले आहे, असा आरोप त्याच्या आई-वडिलांनीही केलाय. माझा मुलगा कधीही आत्महत्या करणार नाही. तो नेहमी म्हणायचा की आत्महत्या पाप आहे. पण, यात राजकारण झालं आहे. पोलिसांना पैसे देऊन विशालची हत्या घडवून आणली, असा गंभीर आरोप विशाच्या आईने केलाय.

पहाटे संपवले जीवन
मिळालेल्या माहितीनुसार, विशाल गवळी तळोजा तुरुंगात होता. त्याच्यावर एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता. त्याने कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या केली. पहाटे तीनच्या सुमारास त्याने शौचालयात गळफास लावून आत्महत्या केली. टॉवेलच्या मदतीने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. विशाल गवळी हा कल्याण परिसरातील एक कुख्यात गुंड होता. त्याच्याविरुद्ध बलात्कार, विनयभंग आणि मुलांवरील लैंगिक अत्याचार यासारखे गुन्हे दाखल होते.

दरम्यान, विशाल गवळीने आत्महत्या केल्याची बामती समोर येताच मृत मुलीच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केलंय.

follow us