Download App

स्वागताला नाशिक ढोल, जेवणाला पुरणपोळी; 6 मुद्दे अजेंड्यावर : पवार-ठाकरे ‘इंडिया’साठी सज्ज

मुंबई : विरोधकांच्या इंडिया आघाडीची तिसरी बैठक येत्या 31 ऑगस्टला मुंबईत होणार असून त्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. शिवसेनेच्या नेतृत्वात होत असलेल्या या बैठकीची ब्ल्यू प्रिंटही तयार करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकूण 6 मुद्दे या बैठकीत मांडण्यात येणार असून, त्यावर सर्वांचे एकमत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. (The third meeting of the opposition India Aghadi will be held in Mumbai on August 31 in the leadership of Sharad Pawar and Uddhav Thackeray)

मुंबईच्या बैठकीत इंडिया आघाडीचा लोगो अनावर कार्यक्रम पार पडणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडिया आघाडीसाठी 3-4 लोगो तयार करण्यात आले असून ते सर्व नेत्यांना पाठवण्यात आले आहेत. बैठकीपूर्वी सर्वांची संमती असलेला एकच लोगो प्रसिद्ध केला जाईल. याशिवाय संयुक्त झेंड्याबाबतही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. आघाडीचा संयुक्त झेंडाही असावा, असे काही नेत्यांचे मत आहे.

दरम्यान, बैठक यशस्वी करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची संयुक्त टीम कार्यरत आहे. खुद्द उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी आतापर्यंत झालेल्या तयारीचा आढावा घेतला आहे. बैठकीच्या एक दिवस आधी पवार-ठाकरे आणखी एक बैठक घेणार आहेत.

भारताच्या मुंबई बैठकीत काय होणार?

1. जागावाटपाचा फॉर्म्युला ठरणार :

विरोधी इंडिया आघाडीसमोर सध्याच्या घडीला सर्वात मोठे आव्हान मानले जात आहे ते जागावाटपाचे. पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. मुंबईच्या बैठकीत काही प्रमाणात जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित होणार असल्याचे बोलले जात आहे.

बंगळुरूच्या सभेतच ‘आप’ने जागावाटपाचा मुद्दा उपस्थित केला होता, पण तो मुंबईच्या सभेपर्यंत पुढे ढकलण्यात आला होता. अलीकडेच नितीश कुमार यांनी मुंबईत होणाऱ्या बैठकीत जागावाटपाचा मुद्दा सोडवला जाईल असे सांगितले होते.

इंडिया आघाडीध्ये जागावाटपाबाबत आतापर्यंत 3 सूत्रे समोर आली आहेत.

ज्या पक्षाचे विद्यमान खासदार आहेत ती जागा त्याच पक्षाला मिळेल. तर अन्य जागांवरील दावा ठरविण्यासाठी 2014 आणि 2019 मधील मतांचा विचार घेतला जाणार आहे. या दोन्ही निवडणुकांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या पक्षांना त्या जागेवर प्राधान्य देण्यात येणार.

तर ज्या राज्यांमध्ये काँग्रेस खूपच कमकुवत आहे, तेथे प्रादेशिक पक्ष जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवतील. पंजाब-दिल्लीमध्ये 50-50 फॉर्म्युला लागू होऊ शकतो. जागावाटपाबाबत छोट्या पक्षांची मागणी जास्त आहे. ज्या राज्यांमध्ये काँग्रेसची भाजपशी थेट स्पर्धा नाही, त्या राज्यांमध्ये पक्षाने लहान भावाची भूमिका बजावली पाहिजे, असे प्रादेशिक पक्षांचे म्हणणे आहे.

आसाम, तेलंगणा, कर्नाटकसह 9 राज्यांमध्ये नेतृत्व काँग्रेसकडे असेल. म्हणजेच या 9 राज्यांमधील जागावाटपाचा निर्णय काँग्रेसला घ्यायचा आहे.

Sharad Pawar : राष्ट्रवादीत फूट का पडलेली नाही? शरद पवारांनी सांगितलं शास्त्रीय कारण

2. समन्वय समितीच्या सदस्यांची नावे निश्चित करणे :

आघाडीमध्ये ताणतणावर टाळण्यासाठी 11 सदस्यांची समन्वय समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. मुंबईच्या बैठकीत या समितीतील सदस्यांची नावे निश्चित केली जाणार आहेत. या समितीत अध्यक्ष, संजयोक आणि सदस्य अशी रचना असणार आहे.

दरम्यान, अध्यक्षपदासाठी सोनिया गांधी यांच्या नावाची चर्चा आहे. तर नितीशकुमार यांचे नाव संजोयक पदासाठी आघाडीवर आहे. समितीचे मुख्यालय दिल्लीत असेल आणि संयोजकपदाला जास्त ताकद असणार आहे. आघाडीतील सर्व वाद संजोयक सोडवतील.

याशिवाय जाहीरनामा आणि आंदोलने आयोजित करण्यासाठी काम करतील अशा 2-3 उपसमिती स्थापन करण्याचीही चर्चा या बैठकीत होणार आहे. जाहीरनामा समितीमध्ये विरोधी पक्षांच्या राज्यसभेतील खासदारांना प्राधान्य मिळू शकते.

3. 2024 च्या जाहीरनाम्यावरही चर्चा :

2024 मध्ये जाहीरनाम्यात कोणकोणते मुद्दे असावेत त्यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे. राज्यातील प्रादेशिक पक्षांना थेट त्यांच्या लोकांपर्यंत पोहोचता यावे, यासाठी राज्यानुसारही जाहीरनामा जारी करावा, असे काही नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे जाहीरनाम्यात कोणत्या मुद्द्यांना राज्यनिहाय प्राधान्य द्यायचे, यावरही मुंबईत होणाऱ्या बैठकीत चर्चा होणार आहे. यासोबतच जातिनिहाय जनगणनेवर सर्व पक्षांची संमती मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. इंडिया आघाडीचा हा सर्वात मोठा मुद्दा ठरू शकतो.

4. इंडिया आघाडीचा लोगो लाँच :

बैठकीपूर्वीच इंडिया आघाडीचा लोगो लाँच केला जाणार आहे. आतापर्यंत 3 ते 4 लोगो तयार करण्यात आले असून यात भारतातील सर्व समाजातील लोकांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याशिवाय संयुक्त झेंड्याबाबतही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. आघाडीचा संयुक्त झेंडाही असावा, असे काही नेत्यांचे मत आहे.

‘अजितदादा उपमुख्यमंत्रीपदासाठी कायम तयार, मला त्यांची दया येते’; कोश्यारींचा खोचक टोला

अशी आहे व्यवस्था :

मुंबईत होणाऱ्या इंडियाच्या बैठकीत 26 पक्षांचे 80 नेते उपस्थित राहणार आहेत. यामध्ये एमके स्टॅलिन, नितीश कुमार, हेमंत सोरेन, ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल या पाच मुख्यमंत्र्यांच्या नावांचा समावेश आहे. काँग्रेसमधून पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि केसी वेणुगोपाल हे उपस्थिती दर्शविणार आहेत.

या 80 नेत्यांसाठी मुंबईतील हयात हॉटेलमध्ये 170 खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. विमानतळावर राष्ट्रवादी-काँग्रेस सर्व नेत्यांचे स्वागत करतील, तर शिवसैनिक हॉटेलवरील व्यवस्थेवर लक्ष देणार आहेत. तुतारी आणि नाशिक ढोलताशाच्या गजरात विरोधकांचे स्वागत करण्यात येणार आहे.

हॉटेल हयात येथेच बैठकीचे आयोजन करण्यात येणार असून इथेच संयुक्त पत्रकार परिषदही होणार आहे. वडा पाव, पुरण पोळी, झुणका भाकर आणि मोदक या महाराष्ट्रातील प्रसिद्ध पदार्थांची जेवणात व्यवस्था करण्यात आली आहे.

Tags

follow us