Sharad Pawar : राष्ट्रवादीत फूट का पडलेली नाही? शरद पवारांनी सांगितलं शास्त्रीय कारण

Sharad Pawar : राष्ट्रवादीत फूट का पडलेली नाही? शरद पवारांनी सांगितलं शास्त्रीय कारण

कोल्हापूर : पक्ष म्हणजे फक्त आमदार नसतात, संघटना असते, सदस्य असतात. आज जर बघितलं तर देशामध्ये जी राष्ट्रवादीची (NCP) संघटना आहे तो पक्ष आहे. आमदार येतात आणि जातात, पण शेवटी पक्ष हा महत्वाचा असतो. आज जे कोणी आमदार आणि खासदार गेले असतेली त्यांच्यासोबत संघटना, पक्ष गेलेला नाही, असं सांगत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षात फूट का नाही, याचे शास्त्रीय कारण स्पष्ट केले. ते टीव्ही 9 मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते. (why not split in ncp sharad pawar said detailed reason)

काय म्हणाले शरद पवार?

राष्ट्रवादीमध्ये कुठलीही फूट नाही, असं तुम्ही सांगितलं. सुप्रियाताई सुद्धा तेच म्हणतात. पण ज्यावेळी 30 पेक्षा जास्त आमदार हे सत्तेमध्ये सहभागी होतात. दोन खासदार सुद्धा भाजपसोबत जातात. मग अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीमध्ये नेमकी फुट कशी नाही हा एक संभ्रम निर्माण होत आहे, असा प्रश्न पत्रकाराने शरद पवार यांना विचारला. यावर त्यांनी सविस्तर उत्तर दिलं.

‘मी स्वबळावर राज्याचा तीनदा मुख्यमंत्री’; पवारांनी वळसे पाटलांना दिले इतिहासाचे धडे

शरद पवार म्हणाले, लोकांना कळत नाही की पक्ष म्हणजे फक्त आमदार नसतात, संघटना असते, सदस्य असतात. आज जर बघितलं तर देशामध्ये जी राष्ट्रवादीची संघटना आहे तो पक्ष आहे. आमदार येतात आणि जातात. पण शेवटी पक्ष हा महत्वाचा असतो. आज जे कोणी आमदार आणि खासदार गेले असतेली त्यांच्यासोबत संघटना, पक्ष गेलेला नाही.

महाराष्ट्रात पक्ष प्रमुख जयंत पाटील होते, आजही तेच प्रमुख आहेत. जेव्हा त्यांना विचारलं की तुमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण तेव्हा त्यांनी माझेच नाव घेतले. पण आता त्यांच्या लक्षात येत की, खरं बोलेल अंगलट येत आहे. त्यावर काही तरी वेगळी भूमिका घ्यायची सुरु आहे. याचा अर्थ पक्ष कुठेही गेलेला नाही. हा मी हे मान्य करतो की 25-26 आमदार असतील मला नक्की आकडा माहित नाही, आम्ही त्याची तपासणी केलेली नाही पण त्यांनी वेगळी भूमिका घेतली, असंही त्यांनी सांगितलं.

कमळ चिन्हावर निवडणूक लढा, नाहीतर.. बावनकुळेंच्या सूचक वक्तव्यातून राणांना थेट इशारा

काय म्हणाले होते शरद पवार?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीत कोणतीही फूट नाही. अजित पवारच आमच्या पक्षाचे नेते आहेत असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर शरद पवार यांनीही त्यावर शिक्कामोर्तब केले. अजित पवार आमच्याच पक्षाचे नेते आहेत. त्यात काहीच वाद नाही. फूट पडणे याचा अर्थ काय, पक्षात फूट कधी होते याचा अर्थ सांगत शरद पवार यांनी हे वक्तव्य केले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube