कमळ चिन्हावर निवडणूक लढा, नाहीतर.. बावनकुळेंच्या सूचक वक्तव्यातून राणांना थेट इशारा
Navneet Rana : राज्यात लोकसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहत आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. नेत्यांचे मतदारसंघांत दौरे वाढू लागले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) अमरावती दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी केलेल्या सूचक वक्तव्याने खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता दिसत आहे. खासदार राणा यांनी 2024 ची निवडणूक भाजपाच्या कमळ या चिन्हावर लढावी, त्यांनी तसं केलं नाही तर मग आम्ही वेगळा विचार करू, असे बावनकुळे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता खासदार राणा काय भूमिका घेतात अशी चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे.
कार्यकर्त्यांना सभेला जाण्यापासून रोखले ; रोहित पवारांना वेगळाच संशय
ते पुढे म्हणाले, आमची सगळ्यांची भावना आहे की नवनीत राणा यांनी कमळ चिन्हावर 2024 ची निवडणूक लढावी. आम्ही त्यांना विनंती करू पण, त्यांचा एनडीएमध्ये सहभाग असल्याने याबाबत केंद्रीय पार्लमेंट्री बोर्ड निर्णय घेईल. त्यांनी जर स्वाभिमान पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला तर मग आम्ही वेगळा निर्णय घेऊ. कारण, अमरावतीचा खासदार हा भाजपचाच व्हावा अशी लोकांची इच्छा आहे.
सन 2019 मध्ये राणा यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढली होती. त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला होता. मागील दोन निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचाही पाठिंबा मिळाला होता. त्यानंतर नवीन राजकीय घडामोडी घडल्या. आमदार रवी राणा यांचा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयात समावेश झाला. त्यामुळे अमरावतीत त्यांची ताकद वाढली.