शेतकऱ्यांसाठी युवक काँग्रेस मैदानात; विधानभवनाबाहेर निदर्शने

मुंबई : मुंबईत विधानभवनाबाहेर महाविकास आघाडीच्या आमदारांकडून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जोरदार आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन आक्रमक पद्धतीने करण्यात येत असून यावेळी कार्यकर्ते विधानभवनाला घेराव घालण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे. विशेषत: हे आंदोलन युवक काँग्रेसच्यावतीने करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. सर्वज्ञानी संजय राऊत थोडी तरी लाज बाळगा, हा मुर्खपणा; चित्रा वाघांनी राऊतांना […]

Congres Protest

Congres Protest

मुंबई : मुंबईत विधानभवनाबाहेर महाविकास आघाडीच्या आमदारांकडून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जोरदार आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन आक्रमक पद्धतीने करण्यात येत असून यावेळी कार्यकर्ते विधानभवनाला घेराव घालण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे. विशेषत: हे आंदोलन युवक काँग्रेसच्यावतीने करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.

सर्वज्ञानी संजय राऊत थोडी तरी लाज बाळगा, हा मुर्खपणा; चित्रा वाघांनी राऊतांना सुनावलं..

आंदोलकांकडून झोपलेलं सरकार जागं होऊ दे, जनतेचा पाडवा गोड होऊ दे, बळीराजाला मदत करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, अशा आक्रमक पद्धतीने घोषणा देण्यात येत आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीच्या आमदारांसह पदाधिकारी उपस्थित आहेत.

तसेच ईडा पिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे… उद्योग चालले बाहेर, वाढती बेरोजगारी… सरकारा गुढी घरी उभारु का शेजारी? असा सवालही या आमदारांकडून सत्ताधारी पक्षाला विचारण्यात येत आहे.

संपाच्या आडून अजेंडा चालविणारे महाभाग कोण? आंदोलनातल्या ‘त्या’ व्हिडीओ वरून चित्रा वाघ आक्रमक

यावेळी आमदारांच्या हाती सरकारविरोधी घोषणांचे बॅनर फडकवून व हातात गुढी घेऊन महागाई, अवकाळी पाऊस, या विषयावर महाविकास आघाडीच्या आमदारांनी सरकार विरोधात हल्लाबोल केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

Maharashtra Politics : बोलणाऱ्याचे अंबाडे विकतात पण…; श्रेयवादावरुन पंकजा अन् धनंजय मुंडेंमध्ये जुंपली

यामध्ये विशेषत: शेतकऱ्यांच्या फळबागा, द्राक्षे, संत्रा, गहु, ज्वारी या पिकांचं मोठ्या प्रमाणात नूकसान झालं असून शेतकरी मोठ्या अर्थिक संकटात सापडला आहे.

तर दुसरीकडे सरकारकडून अद्याप शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्यासंबंधी अद्याप आदेश दिले नसून शेतकऱ्यांना भरघोस मदत करण्याची मागणी महाविकास आघाडीच्या आमदारांकडून करण्यात आली आहे.

Exit mobile version