Download App

कोरोनाचे पुन्हा थैमान! एरिस व्हेरिएंटने वाढवली चिंता, 28 दिवसांत 80 टक्के केसेस वाढल्या

  • Written By: Last Updated:

Corona Eris Variant : गेल्या अडीच वर्षांपूर्वी संपूर्ण जगात कोरोना विषाणूने (Corona virus) थैमान घातले होते. जगभरात कोरोनाचा कहर संपुष्टात आला असला तरी गेल्या काही दिवसांपासून जगातील विविध देशांमध्ये त्याचे नवे रूप समोर आले. त्यामुळं पुन्हा एकदा कोरोना व्हायरस चिंतेचा विषय बनला आहे. कोविड 19 चा नवीन एरिस व्हेरिएंटने (Eris Variant) वेगाने पसरत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ब्रिटनमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत असून भारतातही याची प्रकरणे समोर आली आहेत. गेल्या 28 दिवसांत 80 टक्के प्रकरणे आढळली आहेत. (80 percent of cases of the new eris variant of Covid-19 were detected in the last 28 days)

महाराष्ट्रात मे 2023 मध्ये एरिस व्हेरिएंटचा पहिला रुग्ण आढळून आला होता. कोरोना विषाणूची लाट ओसरल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने मे महिन्यात कोविडला आणीबाणीच्या कक्षेतून काढून टाकले. परंतु आता नवीन प्रकार आढळून येत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. WHO ने नवीन प्रकाराबाबत स्पष्ट इशारा दिला आहे. या प्रकारामुळे रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. UN एजन्सीनुसार, 10 जुलै ते 6 ऑगस्टपर्यंत कोविडच्या प्रकरणांची संख्या 1.5 दशलक्ष होती. तर गेल्या 28 दिवसांत 80 टक्के प्रकरणे उघडकीस आली आहेत. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, या काळात कोरोनामुळे जीव गमावणाऱ्या लोकांच्या संख्येत 57% घट झाली आहे.

किशोरी पेडणेकरांवर आर्थिक गुन्हे शाखेची वक्रदृष्टी, कोविड बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी बजावले समन्स 

12 जून ते 9 जुलै दरम्यान, जगभरात 7 लाख 94 हजार कोविड पेशंट आढळले. 10 जुलै ते 6 ऑगस्ट दरम्यान, नवीन कोविड रुग्णांची संख्या 1.5 दशलक्ष झाली. अलीकडेच WHO ने देखील Omicron च्या नवीन स्ट्रेनच्या शोधाची पुष्टी केली होती.

महत्त्वाचे म्हणजे एरिस प्रकाराची प्रकरणे महाराष्ट्रातही आढळून आली आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, जुलै अखेरीस सक्रिय कोविड रुग्णांची संख्या 70 वरून 6 ऑगस्ट रोजी 115 पर्यंत वाढली. त्याच वेळी, यूकेच्या हेल्थ प्रोटेक्शन एजन्सीनुसार, एरिस स्ट्रेनशी संबंधित कोरोना विषाणूची 7 प्रकरणे समोर आली आहेत, त्यामुळे नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

एरिस प्रकाराशी संबंधित पाच मुख्य लक्षणांमध्ये नाक वाहणे, डोकेदुखी, थकवा (सौम्य किंवा तीव्र), शिंका येणे, घसा खवखवणे, खोकला, वास आणि चव कमी होणे, ताप यांचा समावेश होतो. खराब हवामान आणि कमी प्रतिकारशक्ती यामुळे रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले. या नवीन कोविड प्रकारापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सावधगिरी म्हणून सामाजिक अंतर राखणे गरजेचं आहे.

Tags

follow us