….तेव्हाच भारत विश्व गुरू बनेल; सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठ विधान
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दोन दिवसांच्या व्याख्यानमालेचे बंगळुरू येथे आयोजन करण्यात आलं आहे. त्यामध्ये भागवत बोलले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दोन दिवसांच्या व्याख्यानमालेचे बंगळुरू येथे आयोजन करण्यात आलं आहे. (RSS) आज पहिल्या दिवशी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी संघाचे कौतुक करताना संघाचे वर्णन जगातील सर्वात अद्वितीय संघटना असं केलं. संघ भारतासह अनेक देशांमध्ये सामाजिक सेवा कार्यात गुंतलेला आहे असंही भागवत यांनी आपल्या भाषणात म्हटलं.
जेव्हा भारत जगाला आपलेपणाचे तत्व शिकवेल तेव्हाच भारत विश्व गुरू बनेल. तसंच प्राचीन भारतीय ज्ञान आणि आधुनिक विज्ञानातील यांच्यातील समानतेवर बोलताना भागवत म्हणाले की, आपली परंपरा ज्याला ‘ब्रह्म’ किंवा ‘ईश्वर’ म्हणते, आज विज्ञान त्याला “यूनिवर्सल कॉन्शसनेस” असं म्हणतात. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, ‘समाज केवळ कायद्याने नियंत्रित होत नाही तर सामाजिक सहानुभूतीने चालतो. समाजात सतत आपलेपणाची भावना राखणे आवश्यक आहे. कारण आपलेपणाची ही भावना समाजाला एकत्र आणण्याचे काम करते असंही ते म्हणाले.
संघाचं शताब्दी वर्ष पाहण्याचं सौभाग्य आम्हा स्वयंसेवकांना लाभलं; पंतप्रधानांनी लिहला RSSवर खास लेख
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करणारे डॉ. हेडगेवार यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. लहानपणापासूनच त्यांनी त्यांच्या शाळेत ब्रिटिश अधिकाऱ्यांचे स्वागत वंदे मातरम म्हणून करण्यात सुरुवात केली होती. त्यावेळीही डॉ. हेडगेवार लोकांना ‘वंदे मातरम’ आणि ‘भारत माता की जय’ असं म्हणण्यास प्रोत्साहित करत होते. या प्रयत्वातून त्यांचे भारतावरील प्रेम दिसून येते. हेडगेवार हे एक धार्मिक नेते आणि समाजसुधारक होते.
आज आपली जनता राजकीयदृष्ट्या एकजूट राहिलेली नाही. सामान्य लोकांनीही राजकीयदृष्ट्या जागरूक असलं पाहिजे. राजकीय जागरूकतेमुळे सामान्य लोकांना ‘वंदे मातरम’ आणि ‘भारत माता की जय’ असं म्हणण्याचे धाडस मिळाले आहे. तसंच, संघ राष्ट्रीय घडामोडींमध्ये भाग घेतो. मात्र, तो राजकीय पक्ष नाही. आरएसएस ही समाजाची संघटना आहे, समाजातील संघटना नाही. त्याचबरोबर आपण संघ समजून घेतला पाहिजे. संघाचे अनेक हितचिंतक संघाला एका विशिष्ट परिस्थितीची प्रतिक्रिया म्हणून चित्रित करतात. परंतु, तसं नाही. संघ कोणत्याही प्रतिक्रियेतून किंवा निषेधातून जन्माला आला नाही. संघ प्रत्येक समाजाची एक आवश्यक गरज पूर्ण करण्यासाठी अस्तित्वात आला आहे असंही ते म्हणाले.
