आधी शेअर, मग डिलिट! सुनेत्रा पवारांचे RSS बैठकीनंतर सोशल मीडियातून फोटो गायब, ट्विट करत स्पष्टीकरण…

Sunetra Pawar Controversy Attending Rss Meeting : महाराष्ट्राच्या राजकारणात नवं वादळ उठलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनी (Sunetra Pawar)अलीकडेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) परिवाराशी संबंधित महिलांच्या बैठकीला उपस्थिती लावली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
मोठ्या प्रमाणात टीका
ही बैठक अभिनेत्री आणि मंडी मतदारसंघाच्या खासदार कंगना राणौत यांच्या निवासस्थानी पार पडली. यावेळी भारतमातेचा फोटो तसेच संघ संस्थापक केशव बळीराम हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक माधव गोळवलकर गुरुजी यांचे छायाचित्र दिसत (Maharashtra Politics) होते. बैठकीचं आयोजन राष्ट्रसेविका समितीने केलं होतं, जी संघ परिवारातील महिलांसाठी कार्यरत संघटना मानली जाते. सुनेत्रा पवार यांनी या बैठकीत केवळ उपस्थितीच दर्शवली नाही, तर थोडक्यात भाषणही केलं. त्यांनी स्वतः सामाजिक माध्यमांवर फोटो शेअर करून माहिती दिली. मात्र, उपस्थितीवरून मोठ्या प्रमाणात टीका सुरू झाल्यानंतर त्यांना हे फोटो हटवावे लागले.
एका मीटिंगमध्ये माझ्या उपस्थितीबाबत चर्चा सुरू आहे, ज्याबाबत मी स्पष्टीकरण देऊ इच्छिते की त्यामागे कोणताही राजकीय उद्देश्य नव्हता. यात इतर महिला खासदारही सहभागी होत्या. राज्यसभेच्या खासदार म्हणून आणि बारामतीमध्ये दीर्घकाळ सामाजिक कार्य करत असताना, मला विविध महिला संघटनांच्या…
— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) August 21, 2025
गुडन्यूज! 12 आणि 28 टक्के GST स्लॅब संपणार, मंत्रिमंडळाने केंद्राचा प्रस्ताव स्वीकारला
सुनेत्रा पवार यांचं स्पष्टीकरण
टीकेनंतर सुनेत्रा पवार ‘एक्स’ (माजी ट्विटर) वर पोस्ट करत भूमिका स्पष्ट केली. एका मीटिंगमध्ये माझ्या उपस्थितीवरून चर्चा सुरू आहे. मात्र, माझा कोणताही राजकीय हेतू नव्हता. मी फक्त महिलांच्या संघटनांचे कार्य आणि त्यांचे उपक्रम जाणून घेण्यासाठी गेले होते. तिथे विविध राज्यांतील महिला सहभागी होत्या. राज्यसभा खासदार म्हणून आणि बारामतीमध्ये दीर्घकाळ सामाजिक कार्य करताना मला अशा उपक्रमांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते. भाषण करण्याची विनंती झाल्यामुळे मी फक्त काही शब्दांत माझी भूमिका मांडली. कृपया याला राजकीय रंग देऊ नका, असे त्या म्हणाल्या.
मोठी बातमी! पाकिस्तानकडून अनेक हवाई मार्ग बंद, धक्कादायक कारण…
दुटप्पी राजकारण?
त्यांनी पुढे नमूद केले की, समाजातील महिलांचे कार्य समजून घेणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हाच माझा खरा उद्देश आहे आणि पुढेही राहील. मात्र, या उपस्थितीवरून राजकीय वाद चांगलाच पेटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी थेट अजित पवारांवर निशाणा साधला. बसता उठता अजित पवार शिव, शाहू, फुले, आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांचा जप करतात. पण दुसरीकडे त्यांच्या पत्नी संघाच्या बैठकीला जातात. हे दुटप्पी राजकारण नाही का? असा सवाल रोहित पवारांनी केला.
अजित पवार गटाने नेहमीच आरएसएसपासून अंतर राखल्याचं सांगितलं आहे. त्यांच्या गटातील अनेक आमदार संघाच्या बौद्धिक कार्यक्रमांना जात नाहीत. अशा पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांची उपस्थिती ही केवळ ‘सामाजिक’ की ‘राजकीय संदेश देणारी’? असा चर्चेचा मुद्दा बनला आहे.