Prajwal Revanna : माजी खासदार प्रज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) आणि त्यांचे वडील आमदार एचडी रेवण्णा (HD Revanna) यांच्याविरुद्ध एसआयटीने (SIT) बलात्कार आणि लैंगिक छळ प्रकरणी तब्बल 2 हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले असल्याची माहिती समोर आली आहे. एसआयटी प्रज्वलविरुद्ध चार प्रकरणांचा तपास करत आहे. प्रज्वलविरुद्ध एसआयटीने 2,000 पानांच्या आरोपपत्रात सुमारे 150 साक्षीदारांच्या जबाबांचा समावेश केला असल्याची माहिती एसआयटीच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे.
अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, विशेष न्यायालयात सादर केलेले आरोपपत्र एका मोलकरणीच्या कथित लैंगिक छळाच्या प्रकरणाशी संबंधित आहे. प्रज्वल रेवण्णाविरोधात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात स्पॉट इन्स्पेक्शन, भौतिक, वैज्ञानिक, मोबाइल, डिजिटल आणि इतर माध्यमातून गोळा केलेल्या पुराव्यांचा समावेश आहे. तसेच विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी तज्ज्ञांचे मत घेण्यात आले आहे. अशी देखील माहिती एसआयटीने दिले आहे.
माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात आयपीसीच्या कलम 354 आणि 354(ए) अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 376, 376 (2)(के), 354, 354 (ए) आणि 354 (बी) अंतर्गत प्रज्वल रेवण्णाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्या घरात काम करणाऱ्या एका महिलेने लैंगिक छळाचा आरोप केला होता त्याची चौकशी करण्यासाठी कर्नाटक सरकारकडून एसआयटी स्थापन करण्यात आली होती. रेवण्णा यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते.
नेमकं प्रकरण काय?
माजी पंतप्रधान देवेगैडा यांचे नातू प्रज्वल रेवन्ना यांच्यावर लैंगिक छळ, हजारो सेक्स व्हिडिओ रेकॉर्ड करण्याबरोबरच महिलांना धमकावणे आणि कट रचणे या सारखे अनेक गंभीर आरोप आहेत. प्रज्वल रेवण्णा यांचे वडील कर्नाटकचे आमदार तर, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी हे त्यांचे काका आहेत. रेवन्ना यांच्याविरोधात त्यांच्या स्वयंपाकी महिलेना लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करत पोलिसात तक्रार केली आहे.
भाजपात बंडाची ठिणगी! आमदार राजळेंविरोधात मुंडेंनी थोपटले दंड
दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत संबंधित पीडित महिलेने 2019 ते 2022 दरम्यान आपल्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार झाल्याचे तसेच आपल्या मुलीशी गैरवर्तनही केल्याचे म्हटले आहे. तर, दुसरीकडे प्रज्वल रेवन्ना आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी हे सर्व व्हिडिओ बनावट असल्याचे आणि आपल्या कुटुंबाची बदनामी करण्यासाठी रचलेले षडयंत्र असल्याचे म्हटले आहे.